Maoist attack : माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद
Maoist attack : माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीदSaam Tv

Maoist attack : माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद

छत्तीसगड मधील नारायणपूर जिल्ह्यातील माओवाद्यांनी वानांवर भ्याड हल्ला केले आहे.
Published on

नारायणपूर : छत्तीसगड मधील नारायणपूर जिल्ह्यातील माओवाद्यांनी वानांवर भ्याड हल्ला केले आहे. इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये २ जवान शहीद झाले आहे. यामध्ये नांदेडचे जवान सुधाकर शिंदे यांचा देखील समावेश आहे.

हे देखील पहा-

आलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्याकरिता जात असलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांचा बेछुट गोळीबार करण्यात आला. अचानक या झालेल्या हल्ल्यामध्ये जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, या हल्ल्यामध्ये २ जवान शहीद झाले आहेत.

Maoist attack : माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद
पुलवामात झालेल्या चकमकीत ३ दहशदवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

हल्ल्यानंतर माओवाद्यांनी जवानांच्या एके ४७ बंदुकीसह वाकीटॉकी देखील लुटून नेहले आहे. आज दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास हा हल्ला करण्यात आलेला होता. जवळपास ६०० मीटर दूर दबा धरून, बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये आईटीबीपीचे जवान सहायक सेनानी सुधाकर शिंदे आणि गुरमुख सिंह शहीद झाले आहे.

सुधाकर शिंदे हे नांदेड याठिकाणचे रहिवासी आहेत. महाराष्ट्राच्या सुपुत्राला माओवाद्यांशी लढा देताना वीरमरण आले आहे. जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. पुढील सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com