

राजस्थानमध्ये जावयाने सासूवर कैचीने हल्ला केला
सासूचे नाक कापून नाकाचा तुकडा घेऊन आरोपी फरार झाला
बायको नांदायला येत नसल्याने झालेल्या भांडणानंतर त्याने हे भयंकर कृत्य केले
आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जावयाने कैचीने वार करत सासूचे नाक कापल्याची घटना समोर आली. राजस्थानच्या जालोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून त्याने हे भयंकर कृत्य केले. सासूचे नाक कापून नाकाचा तुकडा घेऊन जावई फरार झाला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. आरोपीचे सासू आणि सासरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने त्यांची दुचाकी अडवली आणि त्याने सासूवर कैचीने हल्ला केला. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानच्या डूंगरी गावात घडली. आरोपी सोहनलालने सासूवर कैचीने वार केले त्यानंतर तिचे नाक कापले. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला तिच्या नवऱ्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या महिलेवर गुजरातमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी सोहनलालची बायको नांदायला येत नाही त्यावरून त्याचे सासरच्या कुटुंबीयांसोबत वाद सुरू आहे. याच वादातून त्याने सासूवर हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.
सोहनलालचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण गेल्या वर्षभरापासून त्याची बायको त्याच्यासोबत राहत नाही. नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं होत होती. त्यामुळे त्याची बायको माहेरी गेली. यावरून सोहनलाल आणि त्याच्या सासरचे यांच्यामध्ये सतत वाद होत होते. सोहनलाल आणि त्याच्या बायकोमधील वाद सोडवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण ती त्याच्यासोबत राहण्यास नकार देत होते. याच कारणावरून सोहनलाल आणि त्याच्या सासरच्या कुटुंबीयांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
या भांडणानंतर सोहनलालची सासू काली देवी संतप्त झाली. ती जावयाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात जात होती. त्यावेळी सोहनलालने तिला अडवले आणि तिच्यावर कैचीने वार केले. त्यानंतर त्याने तिचे नाक कापले. ऐवढ्यावर न थांबता तो सासूच्या नाकाचा तुटलेला तुकडा घेऊन पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी सोहनलालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी झालेल्या सासूला सध्या गुजरातच्या मेहसाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.