

कोलकाता : नंदीग्राम निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोलकाता न्यायालयाच्या न्यायमूर्ती कौसिक चंदा यांच्या खंडपीठासमोर संबंधित यायिकेवर सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूकीच्या निकालात निवडणूक आयोगाने भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना विजयी घोषित केले होते. याच निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आव्हान देत याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, नंदिग्राम मतदार संघातील निवडणूकीच्या निकालात ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी असलेले आणि काही महिन्यांपुर्वीच भाजपाच्या गोटात सामील झालेले सुवेंदू आधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र 294 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणूकीत 213 जागांवर बहुमत मिळवत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल पक्ष विजयी झाला. तर भाजपला केवळ 77 जागांसह पराभव पत्करावा लागला पण 77 जागांसह दुसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला.
निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत ममता बॅनर्जी यांनी याचिका दाखल केली. तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना नंदीग्राम मतदारसंघातील "मतदानाची आणि टपाल मतपत्रिकांची त्वरित पुनर्गणना" करण्याची मागणी केली. मात्र कोणतेही कारण न देता निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी करण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.