माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत FIR; काय आहे संपूर्ण प्रकरण?

west bengal news : माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
west bengal news
west bengal Saam tv
Published On
Summary

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्य विरोधात एफआयआर

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याने खळबळ

पोलिसांत एफआयआर नोंदवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा वादात सापडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सिलिगुडी सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. एका कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी या उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या कार्यक्रमात भाष्य करताना भाजपच्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधला. परंतु भाजपच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांचं वक्तव्य धार्मिक भावना दुखावणारे म्हणत पोलिसांत एफआयआर नोंदवली. परंतु तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे दावा फेटाळून लावला आहे. भाजपने वक्तव्य पोलीस स्टेशनमध्ये चुकीच्या पद्धतीने सादर केलं आहे. परंतु पोलिसांत एफआयआर नोंदवल्याने पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं आहे.

west bengal news
Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी पोलिसांचं पथक टीएमसी महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी देखील पोहोचलं होतं. पोलिसांच्या पथकात वर्दीसहीत साध्या कपड्यावर असणारे पोलीस देखील घरात घुसले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माराहणीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात आठवड्याभरात टीएमसीच्या ७० हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. टीएमसीचा आरोप आहे की, भाजप हेतूपूर्वक पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहे.

west bengal news
Shocking : पोलिस अधिकाऱ्याकडून तरुणीवर बलात्कार, स्पर्धा परिक्षेच्या तयारीत मदत करतो म्हणाला, हॉटेलवर नेलं अन्....

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलीस तपासाच्या आधारावर कारवाई करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com