Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये केला प्रवेश

Bihar Political News : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्र्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी राजदची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
Bihar News
Political News Saam tv
Published On
Summary

राष्ट्रीय जनता दलाला मोठा बसला मोठा धक्का

राजदच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिमा कुशवाहा यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

कुशवाहा यांनी राजदवर कुटुंबवाद आणि कार्यकर्त्यांना न मिळणाऱ्या सन्मानाचा केला आरोप

कुशवाहा यांनी बिहार निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास केला व्यक्त

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिमा कुशवाहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एका कार्यक्रमात प्रतिमा कुशवाहा यांच्यासहित अनेक राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल आणि भाजप नेते संजय मयूख उपस्थित होते.

दिलीप जायसवाल यांच्या मध्यस्थीने प्रतिमा कुशवाहा यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिमा कुशवाहा यांनी म्हटलं की, 'मी छठी मातेला प्रार्थना करते की, बिहारमध्ये एनडीए सरकारची स्थापना व्हावी, कारण बिहारचा विकास जलदगतीने व्हावा. लालू प्रसाद यादव यांचा पक्ष हा आधीसारखा राहिला नाही. दुसऱ्या पक्षातील लोक राष्ट्रीय जनता दलात आले आहेत. यामुळे कुटुंब आणि पक्षाला फटका बसत आहे'.

Bihar News
Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रतिमा कुशवाहा पुढे म्हणाली, 'मी राष्ट्रीय जनता दलातून आली. तो पक्ष आधीसारखा राहिला नाही. त्या पक्षात चांगल्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि आदर मिळत नाहीये.यामुळे राष्ट्रीय जनता दल कमकुवत झाला आहे. या निवडणुकीत माझे कार्यकर्ते उत्तर द्यायला तयार आहेत. निवडणुकीत कळेल कोण किती श्रेष्ठ आहे. आम्ही रोजगार, कल्याणकारी योजना, लोकांना शिक्षित करण्याचं काम केलं. यामुळे आम्हाला साथ द्यावी'.

Bihar News
Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

दिलीप जायसवाल यांनी सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. 'नायक नही खलनायक है यह', असं गाणं ऐकवत त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. बिहारच्या राष्ट्रीय जनता दलात कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. ते कुटुंबाशिवाय कोणालाही जागा देत नाही. राजदची प्रतिमा कुटुंबाला प्राधान्य देणारा पक्ष अशीच आहे. बिहारच्या मतदारांना मोदींची गॅरंटी आणि नितीश कुमार यांच्या विकासावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com