Boarding School Fire In China : बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात भीषण आग, विद्यार्थ्यांसह १३ जणांचा होरपळून मृत्यू

China Boarding School Fire : चीनमधील हेनान प्रांतात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका प्रायमरी बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात भीषण आग लागली. यात विद्यार्थ्यांसह १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला
China Boarding School Fire Latest Update News
China Boarding School Fire Latest Update NewsSAAM TV
Published On

China Boarding School Fire Latest News :

चीनमधील हेनान प्रांतात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका प्रायमरी बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात भीषण आग लागली. यात विद्यार्थ्यांसह १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

चीनमधील सरकारी मीडिया शिन्हुआच्या वृत्तानुसार, यानशानपु गावातील स्थानिकांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता यिंगकाई स्कूलमध्ये आग लागल्याची माहिती दिली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिपोर्टनुसार, आगीच्या (Fire News) घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पोहोचले. रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आले. या आगीत किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, एकूण १३ जणांचा यात होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या आगीच्या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक मीडियानुसार, शाळेच्या (School) संचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

China Boarding School Fire Latest Update News
Solapur Fire News: सोलापुरात विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचा तेंदूपत्ता जळून खाक

सोशल मीडियावर संताप

बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहातील आगीच्या घटनेनंतर चीनमधील सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. सुरक्षेत चूक झाली असेल तर यातील दोषींना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, एका व्यक्तीने सोशल मीडियावर या दुर्घटनेची माहिती दिली आहे. १३ कुटुंबातील १३ मुले एकाच वेळी दगावली. हे खूपच भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया एकाने सोशल मीडियावर दिली आहे.

China Boarding School Fire Latest Update News
Viral Video: हवेतच विमानाला लागली आग, लँडिंग करतानाच थरारक व्हिडीओ आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com