Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये क्रूजर वाहनाला भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Accident: डांगदुरी पॉवर प्रोजेक्ट साइटजवळ हा अपघात झाला.
Jammu Kashmir Accident
Jammu Kashmir AccidentSaam TV

Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.35 च्या सुमारास डच्चन भागातील डांगदुरी पॉवर प्रोजेक्ट साइटजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

गाडीमध्ये एकूण 10 जण प्रवास करत होते, त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे.  (Latest Marathi News)

Jammu Kashmir Accident
Bacchu Kadu News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी, मंत्रिपदाचा दर्जा जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, डांगदुरी वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या क्रुझ कारला हा अपघात झाला.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अपघाताची माहिती देताना सांगितलं की, किश्तवाडचे उपायुक्त डॉ. देवांश यादव यांच्याकड़ून डांगदुरी धरणाच्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघाताची माहिती घेतली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

Jammu Kashmir Accident
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

जखमींना आवश्यकतेनुसार किश्तवाड जिल्हा रुग्णालयात किंवा जीएमसी डोडा येथे हलवले जात आहे. आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com