प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने घेतली भाजप नेते विनोद तावडेंची भेट. विधानसभा निवडणूक लढणार? तावडे यांची पोस्ट व्हायरल.
Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025
Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025Saam
Published On
Summary
  • बिहार विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलं.

  • प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर राजकीय रिंगणात उतरणार?

  • भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत.

बिहार विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलंय. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये निवडणुका २ टप्प्यांत होणार आहेत. ६ नोव्हेंबरला पहिला टप्पा. तर, ११ नोव्हेंबरला दुसरा टप्प्याचं मतदान पार पडणार आहेत. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. काल झालेल्या घोषणेनंतर राज्यातील सर्वच पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला कारण ठरलं आहे, भाजप नेत्याची पोस्ट. तसेच मैथिली ठाकूरने भाजप नेत्यांशी घेतलेली भेट. यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान, मैथिली ठाकूर यांचे वडिलही उपस्थित होते. त्यांचा फोटो समोर आला आहे.

Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025
दिवाळीनंतर निवडणुका लागणार? BMCच्या विभागरचनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर

मैथिली ठाकूरने भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान, तिचे वडीलही तेथे उपस्थित होते. या भेटीनंतर विनोद तावडेंनी त्यांच्या अधिकृत समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली. '१९९५ साली लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार सोडून गेलेल्या एका कुटुंबातील मुलगी, गायिका मैथिली ठाकूर आता बिहारची बदलती गती पाहून, पुन्हा बिहारला परत येऊ इच्छित आहे. आम्ही तिच्याकडे बिहार राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. मैथिली ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा'.

Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025
भाजप खासदार अन् आमदारावर प्राणघातक हल्ला; पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जात असताना भंयकर घडलं

या पोस्टमुळे मैथिली ठाकूर बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चर्चेनंतर मैथिली ठाकूरने एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारसाठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांशी होणारा प्रत्येक संवाद मला सेवेच्या शक्तीची आठवण करून देतो. नित्यानंद रायजी आणि विनोद तावडेजी यांचे खूप आभार'. विनोद तावडे यांनी केलेली पोस्ट आणि मैथिली ठाकूर यांनी दिलेली प्रतिक्रिया, यामुळे गायिका लवकरच राजकीय रिंगणात उतरणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com