90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

Voter Names May Be Missing From Draft Electoral Rolls: निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेत 90हून अधिक विधानसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात काय वास्तव समोर आलंय ? कोणत्या मतदारसंघात राजकीय परीणाम होण्याची शक्यता आहे? पाहूया एक रिपोर्ट
MAHARASHTRA SIR DRIVE: 90+ ASSEMBLY SEATS FACE VOTER EXCLUSION RISK
MAHARASHTRA SIR DRIVE: 90+ ASSEMBLY SEATS FACE VOTER EXCLUSION RISKsaam tv
Published On

मतदारयाद्या शुद्धीकरणासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पडताळणी म्हणजेच एसआयआर मोहीम हाती घेतली आहे. देशभरात टप्प्याटप्प्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेवर विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला आहे. यापूर्वी ज्या राज्यात ही मोहीम राबविण्यात आली, तिथे लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम असून विरोधातील मतदारांची नावे कमी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. राज्यात राबविण्यात मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर आलंय.

90हून अधिक विधानसभा मतदारसंघांत 25 टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही.

7 कोटी 71 लाख 50 हजार मतदारांच्या

स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. मात्र, सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघांतील मोठ्या संख्येने मतदारांची नावे 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे. यामुळे आगामी काळात या मतदारसंघांतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ही मोहीम सुरु राहणार असून नागपूरमध्ये २३ हजार मृत मतदारांची नावे आढळल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर एक कोटीच्या वर नाव वगळलेली आहेत, असा आरोप ठाकरे सेनेने केलाय. मुंबईतील सर्वच मतदारसंघांत ४० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. कुलाबा मतदारसंघात तर सुमारे ४७ टक्के मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. पिंपरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांत ४० ते ४५ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नसल्याने त्यांच्या नावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अंतीम यादी येण्यापूर्वी मतदारांचा प्रतिसाद मिळणार का? एव्हढ्या मोठ्या प्रमाणात नावं वगळली तर मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार?हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com