Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागणार?

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol diesel price
Petrol diesel priceSaam Tv

Petrol Diesel Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. WTI क्रूड प्रति बॅरल 76.78 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.54 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

Petrol diesel price
Pune Crime News: डॉक्टरी पेशाला काळीमा! डॉक्टरने रुग्ण महिलेला रुग्णालयात बोलावून केलं घृणास्पद कृत्य

बिहारमध्ये पेट्रोल (Petrol) 51 पैशांनी तर डिझेल 48 पैशांनी महागलं आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल 34 पैशांनी आणि 31 पैशांनी महागलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 38 पैशांनी वाढले आहे. तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळमध्येही इंधनाचे दर वाढलेले दिसत आहेत. 

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 69 पैशांनी आणि डिझेल (Diesel) 68 पैशांनी स्वस्त झाले आहे. यासोबतच राजस्थानमध्ये पेट्रोलमध्ये 20 पैशांची आणि डिझेलच्या दरात 18 पैशांची घसरण पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकातही इंधन स्वस्त झाले आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol diesel price
Mega Block Mumbai Local: उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! आत्ताच पाहा रविवारचं वेळापत्रक

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com