Mega Block Mumbai Local: उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! आत्ताच पाहा रविवारचं वेळापत्रक

Mega Block April 30, 2023: रविवार ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai local train update
Mumbai local train updatesaam tv
Published On

Mumbai local train update: रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी उद्या रविवार ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मात्र सदर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांवरच थांबणार आहेत.

Mumbai local train update
IPL 2023: ऑरेंज कॅपची लढत आणखी रोमांचक, पर्पल कॅप या गोलंदाजाच्या डोक्यावर

हार्बर मार्ग सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी जणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या गाड्या बंद असणार आहेत. (Mumbai Local)

Mumbai local train update
Rashi Bhavishya In Marathi : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

पश्चिम रेल्वेही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते जोगेश्वरी दरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत पर्यंत ब्लॉक असणार आहे. (Latest Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com