Ayodhya bus accident: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या बसचा अपघात, ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

Maharashtra to Ayodhya bus tragedy: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident
AccidentSaam Tv News
Published On

महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन धडकली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवर घडला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत.

अपघातात दोन्ही वाहने पूर्णपण जळून खाक

लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवर एक भीषण अपघात घडला आहे. मिनी बस चालकाला अचानक डुलकी लागली. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उभी असणार्‍या बिघडलेल्या बसला जाऊन धडकली. मिनी बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. ज्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Accident
Delhi Railway Station: माणुसकी संपली! चेंगराचेंगरीत चोरट्यांनी केला हातसाफ, मृतांच्या अंगावरील सोनं गायब; खिसे कापून पैसेही लुटले

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये १ महिला तर ३ पुरूषांचा समावेश आहे. तसेच २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर चालक फरार झाला असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

Accident
Delhi railway station: चप्पला, कपड्यांचा खच आणि पायाखाली मृतदेह, स्टेशनवरील हमालानं सांगितलं नेमकं काय घडलं

फरार चालकाचा शोध सुरू

अपघाताची माहिती मिळताच एसपी दिनेश कुमार सिंह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस छत्तीसगडहून वृंदावनमार्गे अयोध्येला जात होती. त्याचवेळी मिनी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बसला धडकली. त्यानंतर चालक फरार झाला. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com