

मध्य प्रदेशात घडली अपघाताची थरारक घटना
दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी
मध्य प्रदेशच्या डिंडोरी भागात अपघाताची थरारक घटना घडली आहे. जबलपूर-अमरकंटक राष्ट्रीय महामार्गावर पिकअपने ६ जणांना चिरडलं. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. तर स्थानिकांनी मदतीसाठी एकच धावाधाव केली.
अपघात झाल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. पिकअप चालकाला ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीदरम्यान चालकाने सांगितलं की, 'गाडी चालवताना रस्त्यावर मला काही दिसलं नाही. त्यावेळी त्यांच्या पिकअपला धडक बसली'.
अपघाताची घटना शनिवारी रात्री एक वाजता घडली. जबलपूर-अमरकंटक राष्ट्रीय महामार्गावर किकरा तलावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ५ जणांच्या मृत्यूने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जण पिकअपने गावी निघाले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या नॅशनल हायवेने येणारा पिकअर पंक्चर होऊन अनियंत्रित होऊन दुसऱ्या पिकअपला धडक दिली. या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ५ जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पिकअप पंक्चर झाल्याने अपघात झाला. त्यानंतर चालकाला समोर काही न दिसल्याने दुसऱ्या पिकअपला धडक दिली. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.