Shocking : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; घरात एकट्या असलेल्या १८ वर्षीय बहिणीवर चुलत भावानं केला बलात्कार

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केल्याची घटना . पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.
KHANDWA RAPE CASE: 18-YEAR-OLD GIRL ALLEGES SEXUAL ASSAULT BY COUSIN, ACCUSED ON THE RUN
KHANDWA RAPE CASE: 18-YEAR-OLD GIRL ALLEGES SEXUAL ASSAULT BY COUSIN, ACCUSED ON THE RUNSaam Tv
Published On
Summary
  • खांडवा जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणीवर चुलत भावाकडून बलात्कार

  • घरात एकटी असलेचा फायदा उचलून तरुणीवर अत्याचार केला

  • पोलिसांत गुन्हा दाखल

  • प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे

Madhya Pradesh Rape Case Crime News मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील पिपलोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीवर तिच्याच ३० वर्षीय चुलत भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आई काही कामानिमित्त इंदूर येथे गेली होती. पीडित तरुणी आणि तिचा चुलत भाऊ यावेळेस घरात एकटेचं होते. त्यावेळी घरात ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. या घटनेनंतरही आरोपीकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू राहिल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, कुटुंबाच्या बदनामीमुळे तरुणी गप्प राहिली.

KHANDWA RAPE CASE: 18-YEAR-OLD GIRL ALLEGES SEXUAL ASSAULT BY COUSIN, ACCUSED ON THE RUN
Skin Care Alert : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे

काही दिवसानंतर तरुणीने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. मुलीकडून ही माहिती मिळताच आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पिपलोड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तरुणीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

KHANDWA RAPE CASE: 18-YEAR-OLD GIRL ALLEGES SEXUAL ASSAULT BY COUSIN, ACCUSED ON THE RUN
Shocking : बीड हादरलं! दोन तरूणांकडून तरुणीवर बलात्कार; एकानं लॉजवर नेलं, दुसऱ्यानं गुंगीचं औषध दिलं, ब्लॅकमेल करून सोनंही लुटलं

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com