Accident News: पिकनिक ठरली अखेरची; दोन जुळ्या बहिणींसोबत 4 जणांचा नदीत बुडून मृत्यू, मध्य प्रदेशमधील घटना

Madhya Pradesh Accident News: मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना बातमी समोर आली आहे. उमरिया जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
Accident News
Accident NewsYandex

Drowning In Sone River

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उमरिया जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या चौघांमध्ये दोन 19 वर्षांच्या जुळ्या बहिणी आणि 21 आणि 22 वर्षांच्या दोन तरूणांचा समावेश आहे. सध्या पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना बातमी समोर आली आहे. उमरिया (Umaria) जिल्ह्यात पिकनिकसाठी गेलेल्या चार जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या चार मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश आहे. चौघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत होते. ते पाहून तेथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी ( Drowning In River) पोहोचले. पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

ही घटना टिकरी टोला गावाच्या हद्दीतील सोन नदीजवळ घडली. शहडोल येथील आठजण २७ मार्च रोजी तेथे पिकनीकसाठी आले होते. यामध्ये दोन 19 वर्षीय जुळ्या बहिणींचाही समावेश होता. या दोन जुळ्या बहिणी आणि त्यांच्यासोबत दोन तरूण (वय 20 वर्षे आणि 22 वर्षे) फिरत फिरत सोन नदीजवळ पोहोचले. हे चौघेजण पोहण्यासाठी पाण्यात गेले (Madhya Pradesh Accident News) होते. पण काही वेळानंतर त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसू लागले.

घटनास्थळी उपस्थित इतर लोकांनी त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिल्यानंतर एकच आरडाओरड झाला. त्यांना वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. यावेळी उपस्थित लोकांनी पोलिसांना फोन (Drowning In Sone River) केला. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. चारही मृतदेह नदीतून बाहेर काढले.

घुंघुटी पोलीस चौकीचे प्रभारी भूपेंद्र पंत या प्रकरणाची माहिती देताना म्हणाले की, हे चौघेजण सोम नदीजवळ पिकनिकसाठी आले होते. यावेळी त्यांचा नदीत (Sone River) बुडून मृत्यू झालाय. आंघोळ करण्यासाठी हे लोक खोल पाण्यात गेले असावे. तिथे त्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या अपघातात चौघांचाही मृत्यू (Drowning) झालाय. सध्या पोलिसांच्या पथकाने चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com