LPG Price: घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, आजपासून नवीन दर लागू

याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.
LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता
LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यताSaam Tv
Published On

नवी दिल्ली - घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर आजपासून (२२ मार्च) लागू होणार आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह (Punjab) 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी (LPG) सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळत होता. याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते. आजपासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवरून 949.5 रुपये झाली आहे.

हे देखील पहा -

कोणत्या शहरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे?

मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर खरेदी केल्यास तुम्हाला 949.50 रुपये मोजावे लागतील आणि कोलकातामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर खरेदी केल्यास तुम्हाला 976 रुपये मोजावे लागणार आहे. याशिवाय चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 915.50 रुपयांवरून 965.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर बिहारच्या पाटणामध्ये आता घरगुती एलपीजी सिलिंडर 1039.5 रुपयांना मिळेल, जे आधी 998 रुपये होते.

LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता
शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मनमानी?

6 ऑक्टोबर 2021 नंतर, घरगुती LPG सिलेंडर 21 मार्च 2022 पर्यंत स्वस्त किंवा महाग नव्हते. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीने प्रति बॅरल 140 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत लक्षणीय बदल झाला. ऑक्टोबर 2021 ते 1 मार्च 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 275 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 1 मार्च 2021 ते 2022 दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 81 रुपयांनी वाढ झाली होती. त्यांनतर आता घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com