Shirdi News
Shirdi NewsSaam Tv

शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मनमानी?

विश्वस्तांना अंधारात ठेवून होतायत निर्णय? साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांचा प्रशासनावर गंभीर आरोप
Published on

शिर्डी - शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा संस्थानच्या प्रशासनाचं कामकाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यावेळी तर खुद्द संस्थानच्या (Saibaba Sansthan) विश्वस्तांनीचं प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी संस्थान कामकाजात मनमानी करत असून सरकार नियुक्त विश्वस्त मंडळाला अंधारात ठेवून प्रशासनाकडून संस्थानबाबत निर्णय होत असल्याचा गंभीर आरोप साई संस्थांनचे विश्वस्त सचिन गुजर यांनी केला आहे.

हे देखील पहा -

सरकारकडून विश्वस्त मंडळ नियुक्त झाल्यानंतरही प्रशासनाकडून संस्थानच्या कोणत्याही निर्णयाबाबत विचारलं जात नाही की कळवलं देखील जात नसल्याने प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर अनेक विश्वस्त नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या पालख्यांना मनाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शनाच्या वेळा बदलणं, साईंच्या शेज आणि काकड आरती बंद करण्याचा निर्णय, गुरुवारी असणारी साईंची पालखी रद्द करण्याचा निर्णय असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय परस्पर घेण्यात येऊन विश्वस्तांना कळवण्यात देखील आले नाहीत, संस्थानच्या उत्सवांना विश्वस्तांना साधं निमंत्रण देखील दिलं जात नाही, असा गौप्यस्फोट सचिन गुजर यांनी केला आहे.

Shirdi News
१७० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून पती-पत्नीवर गुन्हा दाखल

शिर्डी देवस्थान देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात श्रीमंत देवस्थान असून संस्थानची उलाढाल कोट्यावधींच्या घरात आहे. संस्थानचं कामकाज भाविकांभिमुख असावं, सुरळीत चालावं, यासाठी IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सरकार नियुक्त विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी विश्वस्तांना अंधारात ठेवून निर्णय घेत असल्यानं प्रशासनाविरोधात विश्वस्तांमध्ये नाराजी आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com