

ऐकलतं,"भगवान श्रीकृष्ण हे दररोज ५ वेळा नमाज पठण करायचे" असा अजब दावा करणारे हे आहेत.मौलाना जरजिस अन्सारी. मौलाना अन्सारींच्या याचं वादग्रस्त विधानानं हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विशेष म्हणजे, श्रीकृष्णाबद्दल विधान करताना अन्सारी यांनी थेट श्रीमद्भगवद्गीतेच्या 6 व्या अध्यायातील 10 व्या श्लोकाचा आधार घेतलाय. अन्सारी नेमकं काय म्हणाले. ऐका.
मौलाना अन्सारीचा झारखंडमधील एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्रापर्यंत या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत...संतप्त झालेल्या महंत विष्णू दास यांनी तर अत्यंत टोकाची भूमिका घेत..."जो कोणी या मौलानाची जीभ कापून आणेल, त्याला 10 लाख रुपयांचे इनाम दिले जाईल," अशी घोषणा केलीय... मंत्री उदय सामंतांनीही मौलानावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.