हृदयस्पर्शी! चिमुकलीची देशभक्ती पाहून भारतीय जवान झाले भावूक; पाहा आजचा सुंदर Video

Little girl gets blessings of Army Soldier Video: या चिमुकलीचं देशांच्या जवानांप्रती असलेलं प्रेम आणि देशभक्ती पाहून सर्वचजण तिचं कौतुक करत आहेत.
Little girl gets blessings of Soldier
Little girl gets blessings of SoldierTwitter/@PCMohanMP
Published On

मुंबई: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. गोंडस लहान मुलांचे नखरे पाहून आपलं मन अगदी लहान मुलांसारखं प्रसन्न होतं. मात्र हीच लहान मुलं अनेकदा अशी कृती करतात की, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी पडतं. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक गोंडस चिमुकली (Little Girl) भारतीय जवानाच्या (Indian Soldier) पाया पडताना दिसत आहे. या चिमुकलीची देशभक्ती पाहून सर्वच जण तिच्या प्रेमात पडतायत. खासदार पी. सी मोहन यांनी हा सुंदर व्हिडिओ शेयर केला आहे, ज्याला १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून त्यावर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. (Little Girl Heartwarming Video)

हे देखील पाहा -

व्हायरल व्हिडिओ हा कुठल्यातरी मेट्रो स्टेशनवरचा आहे. यात काही जवान आपल्या मेट्रो ट्रेनची वाट पाहत उभे असतात. तेव्हा एक गोंडस लहान मुलगी एका जवानाकडे जाते आणि आवाज काहीतरी बोलते. तेव्हा तो जवान चिमुकलीला पाहतो आणि प्रेमाने तिचे गाल ओढतो, यावेळी बाकीचे दोन जवानही तिथे येतात आणि स्मितहास्य करुन तिला बघत असतात. यानंतर त्या चिमुलकीने खाली वाकत आपल्या इवल्याश्या हातांनी एका जवानाच्या पायांना (बुटांना) स्पर्श करत पाया पडल्या. चिमुलकीची ही कृती पाहून जवानांचंही काळीज पिघळलं आणि मग त्याने आपल्या दोन्ही हातांनी त्या लहान मुलीचे गाल अलगद धरले आणि तिला आशीर्वाद दिले. या चिमुकलीचं देशांच्या जवानांप्रती असलेलं प्रेम आणि देशभक्ती पाहून सर्वचजण तिचं कौतुक करत आहेत. ज्यांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे, ते खासदार पी. सी मोहन व्हिडिओला कॅप्शन दिलं की, "देशभक्त तरुण मनांचे संगोपन करणे हे या महान राष्ट्रासाठी प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे."

Little girl gets blessings of Soldier
Kokan News : अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतुक सुरु (व्हिडिओ पाहा)

नेटीझन्सकडूनही भरभरुन प्रेम

या व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज, १४ हजारांपेक्षा जास्त रिट्वीट्स आणि १ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. नेटीझन्सकडूनही यावर हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने लिहीलं की, "माझे डोळे आनंदाश्रूंनी ओघळले. आपल्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवाने लहानाचे मोठे केले आहे." तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, मनाला स्पर्श करणारा क्षण. मला खूप भावूक केले. हेच आहेत संस्कार. तर आणखी एका यूजरने लिहीलं की, हा भारतीय संस्कृतीचा आणि त्यांच्या मुलांवर देशभक्तीपर शिक्षणाचा परिणाम आहे. या चिमुकलीच्या आई-वडिलांनी प्रणाम, या चिमुरडीप्रमाणेच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन वाढवा, अशा अनेक कमेंट्सचा पाऊस या व्हिडिओवर पडत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com