सरकारच्या 'या' निर्णयावर दारु विक्रेते नाराज; प्रसंगी दुकान बंद ठेवण्याचा दिला इशारा

मद्य खरेदीच्या नव्या प्रणालीमुळे विक्रेते झालेत नाराज.
liqour shop
liqour shopsaam tv
Published On

बंगळरु : कर्नाटक (karnataka) राज्य सरकारच्या नव्या अबकारी धोरणाविरुद्ध मद्य (liqour) विक्रेते तीव्र नाराज झाले आहेत. या धाेराणामधील जाचक अटी मागे घेण्याची मागणी त्यांनी केली असून ती मान्य न झाल्यास १९ मे नंतर बंगळूरसह (banglore) जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने एक दिवस बंद ठेवू असा इशारा देण्यात आला आहे. (bengaluru liqour latest news)

सरकारने पेय महामंडळाकडून (Karnataka State Beverages Corporation Ltd) मद्य खरेदीची सक्ती केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने मागणी (order) द्यावी लागते. या व्यवस्थेमधील अडचणींमुळे ती मद्य विक्रेत्यांना रुचलेली नाही. बहुतांश वेळा सर्व्हर डाऊन (server down) असताे. त्यामुळे पुर्वीच्या व्यवस्थेप्रमाणेच मद्य खरेदीची परवानगी मिळावी मागणी विक्रेत्यांची आहे. कर्नाटकातील फेडरेशन ऑफ वाईन मर्चंट्स असोसिएशनचे करुणाकर हेगडे यांनी द हिंदूशी बाेलताना म्हणाले एक एप्रिलपासून KSBCL ने ऑनलाइन खरेदी करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. त्यातील त्रुटींमुळे माल मिळण्यास अडचणी जाणवत आहेत.

liqour shop
वीज निर्मिती संकटाचा सामना करावा लागणार नाही; काेयना धरण व्यवस्थापनेचा दावा

नव्या व्यवस्थेनुसार आवश्यक मद्यसाठा रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेत ऑनलाईन नोंदवावा लागतो. या काळात सर्व्हर डाऊन असेल तर आवश्यक मद्यसाठा नोंदवण्यात अडचणी येतात. परिणामी मद्य पुरवठा होत नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार मद्य विक्री करता येत नाही असे (benglauru) काही विक्रेत्यांनी नमूद केले.

दरम्यान आजपासून (मंगळवार, ता.१७) १९ मे पर्यंत विक्रेत्यांनी मद्य खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच जुनी व्यवस्था कायम ठेवावी अन्यथा १९ मे नंतर एक दिवस सर्व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली जातील असा इशारा देखील स्थानिक माध्यमांशी बाेलताना विक्रेत्यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

liqour shop
Ajit Pawar: 'मविआ' त धूसफूस? तिघे असल्याने भांड्याला भांड लागणारच : अजित पवार
liqour shop
...अन्यथा कांदा उत्पादकांसह 'स्वाभिमानी' रस्त्यावर उतरेल; तुपकरांचा सरकारला इशारा
liqour shop
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com