2000 Notes Exchange Process : SBI कडून नवं अपडेट ! कशी असेल 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

SBI Rules : 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार अशी बातमी RBI कडून आल्यानंतर नागरिकांकडे संभ्रम निर्माण झाले आहे.
2000 Notes Exchange Process
2000 Notes Exchange ProcessSaam Tv
Published On

How to exchange ₹2000 notes in a bank : 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार अशी बातमी RBI कडून आल्यानंतर नागरिकांकडे संभ्रम निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा लांब लचक रांग लावी लागणार का ? फॉर्म भरावे लागणार का ? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनातून बाहेर काढलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 23 मे 2023 पासून सुरू होणार आहे. कोणत्याही बँकेच्या (Bank) शाखेत जाऊन आपण या नोटा सहजपणे बदलू शकतो. यासाठी आपल्याला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही.

2000 Notes Exchange Process
How To Increase Cibil Score: कर्ज घ्यायचयं? पण क्रेडिट स्कोर बिघडलाय ? कसा सुधारवाल तुमचा 'क्रेडिट स्कोर'

1. SBI कडून अपडेट

  • सोशल मीडियावर (Social Media) असाच एक मेसेज व्हायरल केला जात आहे की चलनातून बाहेर काढलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये आयडी प्रूफ आवश्यक असेल.

  • या अहवालांवर, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने त्यांच्या सर्व शाखांना कळवले आहे की, RBI ने गेल्या शुक्रवारी तात्काळपणे चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही फॉर्मची आणि कोणत्याही ओळखीच्या पुराव्याची आवश्यकता नाही.

  • बँकेने 20 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या इतर मूल्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

2. कधीपर्यंत बदलता येतील नोटा (Notes)

  • चलनातून बाहेर काढलेल्या या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

  • RBI नुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते.

  • नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे.

  • विशेष म्हणजे 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याची घोषणा करताना RBI कडून असे सांगण्यात आले की, या नोटा सध्या तरी कायदेशीर राहतील, तसेच मध्यवर्ती बँकेने सर्व बँकांना 2000 च्या नवीन नोटा ग्राहकांना पुन्हा देऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे.

2000 Notes Exchange Process
SBI Order Over Rs2000 Notes: 2000 च्या नोटा बदलण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाची महत्त्वाची सूचना; नागरिकांचा संभ्रम दूर

3. 2016 मध्ये सुरू... 2023 मध्ये बंद

  • 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात सरकारने नोटाबंदीची घोषणा केली आणि तत्काळ प्रभावाने, त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या.

  • यानंतर आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. 2017 मध्ये, त्यांचा कल जोरात होता

  • मार्च 2017 मध्ये, दोन हजार रुपयांच्या सुमारे 89% नोटा मध्यवर्ती बँकेने जारी केल्या होत्या, परंतु 2018 मध्ये त्यांचे चलन कमी झाले

  • 31 मार्च 2018 रोजी 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा होता. एकूण नोटांमध्ये 37.3% शिल्लक होत्या, त्यामुळे त्यांची छपाई थांबली होती.

  • 31 मार्च 2023 रोजी बाजारात 2000 च्या नोटांचा वाटा फक्त 10.8% इतका कमी झाला

2000 Notes Exchange Process
How to choose Career according to zodiac sign : करिअर चुकले तर आयुष्याचे वाजतील बारा ! राशीनुसार कसे निवडाल ?

4. कोणत्याही बँकेच्या शाखेत नोटा बदलल्या जाऊ शकतात

  • या नोटा चलनातून बाहेर काढण्याच्या घोषणेसोबतच, रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात सांगितले की, २००० रुपयांच्या नोटांचा बाजारात वापर कमी होत असल्याने 2018 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवणार आहे.

  • ज्या बँकेत त्याचे खाते आहे त्याच बँकेतून कोणताही ग्राहक 2000 रुपयांची नोट बदलू शकतो का?

  • त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत २०,००० रुपयांच्या नोटा एकाचवेळी बदलून घेऊ शकते, असे म्हटले आहे.

  • म्हणजेच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. नोटा बदलण्याची सुविधा मोफत असेल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com