
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसतोय. 7 मे रोजी मध्यरात्री केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तान घाबरला आहे. अशातच पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी भारताने हा हल्ला हाणून पाडला आहे.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेरसह भारतातील अनेक शहरांमध्ये मिसाईन्स आणि ड्रोनने हल्ला केला. मात्र भारतीय सेनेच्या S-400 वायुरक्षा प्रणालीने पाकिस्तानचे ८ मिसाईल्स हवेतच नष्ट केलेत. तसंच, पाकिस्तानचे २ जेएफ-१७ आणि एक एफ-१६ लढाऊ विमानही पाडण्यात आलंय.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने गोळीबार केला. यानंतर भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, लाहोर, कराची, सियालकोट, बहावलपूर यासारख्या नऊ महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचा वर्षाव केला. रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यांनंतर, सीडीएसच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची आपत्कालीन बैठक झाली.
दरम्यान भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही यासंदर्भात लष्कर आणि सुरक्षा संबंधित आपत्कालीन उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती आहे. पाकिस्तानी लष्कराचे डीजी आयएसपीआर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने केलेल्या १२ ड्रोन हल्ल्यांची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानेकडून आलेल्या मिसाईलचं एक टार्गेट जम्मू एअरस्ट्रिप असल्याची माहिती आहे. मात्र, वेळीच ही कारवाई करत असतानाच भारताने पाकचा हल्ला उधळून लावला आहे. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटने पाकिस्तानचे 2 F-16 जेटला नियंत्रण रेषेजवळच उद्ध्व्स्त केलंय. पाकिस्तानच्या 2 पायलटलादेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
पाकिस्तानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूतील आरएस पुरा परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. याठिकाणी सतत सायरन वाजवला जातोय. सध्या जम्मू शहरात मोबाईल नेटवर्कही काम करत नसल्याची माहिती आहे. सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला असून तंगधारमध्येही मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा मारा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.