
India-pakistan Tension : भारत - पाकिस्तान या दोन देशांत तणाव कमालीचा वाढला आहे. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या अपडेट्स येत आहेत. कोणकोणत्या ठिकाणी ब्लॅकआऊट आहे याबाबत माहिती शेअर केली जात आहे. आपल्या शहराची माहिती देणे ही सुरक्षाविषयक सज्जतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. अशावेळी युद्धजन्यस्थितीत काय करावं आणि काय करू नये, हे जाणून घेऊयात.
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. ते यशस्वी केलं. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. तिथल्या सामान्य नागरिकांना इजा पोहोचू नये याची खबरदारी घेतली गेली. पण दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची खुमखुमी काही कमी झाली नाही. पाकिस्तानने गुरुवारी संध्याकाळी भारताच्या सीमावर्ती भागात मिसाइल आणि ड्रोन हल्ले सुरू केले. त्याचवेळी खबरदारी म्हणून सरकारने काही राज्यांत ब्लॅकआऊट करण्याचे आदेश दिले. मात्र, काही लोक सोशल मीडियावर कोणकोणत्या ठिकाणी ब्लॅकआऊट केले जात आहे याची माहिती देत आहेत. आपल्या शहराची माहिती अशा प्रकारे देणे हे सुरक्षाविषयक सज्जतेच्या दृष्टीने घातक ठरू शकते.
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह सीमेजवळील राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भारतानेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत सोशल मीडियावर कोणती माहिती शेअर करायला हवी, कोणती माहिती शेअर करू नये हे समजून घ्यायला हवे.
तुमच्या शहरात किंवा परिसरातून लष्कराचं कोणतंही वाहन गेल्यास त्याचे व्हिडिओ काढू नयेत.
युद्धजन्य परिस्थितीत सोशल मीडियावर असलेले काही जुने व्हिडिओ आताचे असल्याचे सांगून पसरवू नयेत. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.
गर्दीच्या ठिकाणी गरज नसताना जाऊ नये. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये.
चुकीची माहिती असल्यास त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. भीती किंवा संतापाच्या भरात संयम बाळगावा. कोणतेही बेकायदेशीर पाऊल उचलू नये.
सुरक्षा दलाच्या कोणत्याही कारवाईत अडथळे निर्माण करू नयेत. त्यांनी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहावे. आवश्यक औषधे, दस्तावेज, पाणी, रेशन आदी साठवून ठेवावे.
सुरक्षित ठिकाणं निश्चित करावीत.
शांतता राखावी. अफवांपासून दूर राहावे. सामाजिक सलोखा राखावा.
वयोवृद्ध, लहान मुलं, अपंग लोकांना प्राधान्य देऊन गरज भासल्यास त्यांना मदत करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.