India-Pakistan Conflict : भारताचा दणक्यावर दणका! F-16 नंतर पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडलं, पाकड्यांची कबुली

India-Pakistan War F-16 & JF-17 Fighter Plane Demolished : पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण तो हल्लाही भारताने परतवून लावला आहे. पाकिस्तानचे ड्रोन राजस्थानच्या जैसलमेरमध्येही घिरट्या घालत होते. ते ड्रोनदेखील भारताने पाडले.
india demolished pakistan f 16 & JF 17 fighter jet
india demolished pakistan f 16 & JF 17 fighter jet Saam Tv News
Published On

श्रीनगर : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतरदेखील पाकिस्तानच्या कुरापती सुरु आहेत. पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पण पाकिस्तानचे सर्व प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. पाकिस्तानचे अनेक ड्रोन आज अचानक रात्री जम्मूच्या आकाशात घिरट्या घालू लागले. यानंतर तातडीने भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय झालं. भारताचं S-400 या यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व ड्रोन हाणून पाडले. या दरम्यान जम्मूत सायरनचा आवाज करुन नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं. पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून जम्मूतील विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत, आर.एस. पुरा या भागात पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण भारताने हे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले.

पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण तो हल्लाही भारताने परतवून लावला आहे. पाकिस्तानचे ड्रोन राजस्थानच्या जैसलमेरमध्येही घिरट्या घालत होते. ते ड्रोनदेखील भारताने पाडले. पाकिस्तानचे ड्रोन अकाशात घिरट्या घालत असल्याचं समोर आल्यानंतर जैसलमेरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं. यानंतर पंजाबच्या अमृतसह आणि होशीयारपूर येथे देखील ब्लॅकआऊट करण्यात आले.

india demolished pakistan f 16 & JF 17 fighter jet
Pakistan Attack On Jammu : भारत-पाकिस्तान युद्ध पुन्हा पेटलं! जम्मूत ब्लॅकआऊट, पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताने प्लॅन हाणून पाडला

पाकिस्तानने अचानक केलेल्या या हल्ल्यानंतर भारताने तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलं. पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यासाठी भारताने एअर डिफेन्स गन्सचा वापर केला. तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानचं F-16 आणि JF-17 हे दोन लढाऊ विमान पाडले आहेत. पाकिस्तानच्या सैन्याने देखील आपली दोन विमाने पाडल्याची कबुली दिली आहे.

india demolished pakistan f 16 & JF 17 fighter jet
Big Breaking : पाकिस्ताकडून भारतावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न; जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट, भारताने पाकड्यांचे ८ मिसाईल पाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com