भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करणयात आला. जम्मू काश्मीर आणि राजस्थानमधील काही भागात पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराने हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला हाणून पाडले आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांची ८ तळ नष्ट झालेच, त्याशिवाय लाहोरमधील पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का दिला. भारताने पहलगाम येथील हल्ल्याचा बदला घेत ही कारवाई केली होती. आता पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरू झाल्या आहेत. जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आले. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल अन् ड्रोल हाणून पाडले.
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीड वाजता ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्कर अथवा सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यात आले नसल्याचे भारताने स्पष्ट केले. भारताने ऑपरेश सिंदूरने पाकिस्तानला अद्दल घडवली. पण पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पाकड्यांचे F-16 विमान पाडले
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानने भारतातील महत्त्वाच्या शहरांमधील लष्करी आस्थापनांना ड्रोन आणि मिसाइल्सद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एकात्मिक काउंटर S-400 'सुदर्शन चक्र' हवाई संरक्षण यंत्रणेने ही हल्ल्याची योजना हाणून पाडली. याच कारवाईदरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडले.
पाकिस्तानचा दावा आणि भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानने भारताने २५ ड्रोन पाठवल्याचा दावा केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईला "युद्धाची कृती" संबोधून याला "जोरदार प्रत्युत्तर" देण्याची धमकी दिली. दुसरीकडे, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या दाव्यांना "खोटारडेपणा" ठरवले. भारताची कारवाई केवळ दहशतवादी पायाभूत सुविधांवर केंद्रित असल्याचे स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) सलग १४ दिवस गोळीबार केला आहे. यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ, तंगधार आणि राजौरी भागात १५ नागरिकांचा मृत्यू झाला आणि ४४ जण जखमी झाले. भारतानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील २७ विमानतळांवर व्यावसायिक उड्डाणे 10 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर आणि F-16 विमान पाडत भारताने पाकिस्तानला पुन्ह तोंडावर पाडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.