भारतीय लष्कराला मोठं यश! CRPF तुकडीवर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Kulgam Encounter Latif Bhat among two terrorists killed : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ११ नोव्हेंबरला गस्तीवर तैनात सीआरपीएफ जवानांवर हल्ला करणाऱ्या 'लश्कर'च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार लतीफ भट्ट याचा देखील समावेश आहे.
कुलगाम सीआरपीएफ तुकडीवरील हल्ल्याचा 'बदला'पुरा! चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
कुलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडसह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत टिपलं.saam tv
Published On: 

जम्मू -काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी चकमकीत कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड लतीफ भट्ट याच्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाममध्ये ११ नोव्हेंबरला गस्तीवर तैनात असलेल्या सीआरपीएफच्या तुकडीवर दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते.

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी रविवारी मीर बाजार परिसरात घेराव घातला. तसंच दहशतवाद्यांच्या शोधासाठी हाती घेतलेली मोहीम अधिक तीव्र केली होती. सुरक्षा दलाच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. सीआरपीएफच्या जवानांवर ११ नोव्हेंबरला हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत होता. या हल्ल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी जवानांनी परिसराला घेराव घातला होता. ही शोधमोहीम जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक यांच्या देखरेखीखाली सुरू होती.

११ नोव्हेंबरला काय घडलं होतं?

११ नोव्हेंबरला कुलगाम जिल्ह्यात गस्तीवर तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता. दुपारी साधारण सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेनंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. तसेच हल्ल्यात जखमी जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सीआरपीएफकडून देण्यात आली होती.

'लश्कर'चा एकमेव कमांडर मारला गेला

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लश्करचा एकमेव कमांडर लतीफ भट्ट हा मारला गेला. या वृत्ताला अद्याप कुणाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कुलगाम सीआरपीएफ तुकडीवरील हल्ल्याचा 'बदला'पुरा! चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीर हादरलं! दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांचा CRPF जवानांवर अंदाधुंद गोळीबार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.