बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Kolkata Police Raid On TMC ZP Member: पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्य टीना भौमिक साहा यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल ३ किलो सोन्याचे दागिने जप्त केले.
 Kolkata Police Raid On TMC ZP Member
₹4 CRORE GOLD HAUL! 3 KG JEWELLERY RECOVERED FROM ZP MEMBER'S HOUSE IN BENGALAI
Published On
Summary
  • नादिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य टीना भौमिक साहा यांच्या घरावर पोलिसांचा छापा

  • छाप्यात ३ किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

  • जप्त सोन्याची अंदाजे किंमत ४ कोटी रुपये असल्याचा दावा.

कोलकातामध्ये सत्तांतर झाल्यानंतर टीएमसीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. टीएमसीचे अनेक नेते सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आलेत. अनेकांच्या घरावर पोलिसांनी छापेमारीदेखील झाली आहे. बहुतेक नेत्यांच्या घरातून पोलिसांना पैशांचं घबाड सापडलंय. आताही टीएमसीच्या एका झेडपी सदस्याच्या घरातून पैशांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलंय.

 Kolkata Police Raid On TMC ZP Member
५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगाल पोलिसांनी नादिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्य टीना भौमिक साहा यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये तब्बल 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने सापडले आहे. याा कारवाईमुळे राजकारणात खळबळ उडालीय. टीना भौमिक साहा या तृणमूल काँग्रेसचे नेते सब्यसाची दत्ता यांच्या निकटवर्तीय आहेत. बिधाननगरमध्ये माजी महापौरांना अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टीना भौमिक साहा यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी ४ कोटी रुपयांचं सोनं जप्त केलंय.

 Kolkata Police Raid On TMC ZP Member
Pimpri-Chinchwad: पहिल्याच दिवशी खासगी शाळेवर छापेमारी; पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य जप्त, शिक्षण विभागाची मोठी कारवाई

रात्रभर घरात पोलिसांकडून तपासणी

टीना साहा यांच्या घरी तेहट्टा येथे राहणाऱ्या टीना साहा यांच्या घरी सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. रात्रभर पोलिसांनी घराची तपासणी केली. काही दिवसांपूर्वीच बिधाननगर साउथ पोलिसांनी माजी महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सब्यसाची दत्ता यांची बेकायदेशीर संपत्ती प्रकरणात अटक केली. दत्ता हे विधानसभा निवडणुकीत बारासात मतदारसंघातून उभे होते. पण, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ही कारवाई झालीय.

सब्यसाची यांच्याकडे अवैध संपत्ती कुठून आली याचा पोलीस तपास करत आहे. अवैध मार्गाने जमावलेला पैसा हा त्यांनी सोनं खरेदी करून गुंतवला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दत्ताा यांचा एक फ्लॅट आणि बँक लॉकर जप्त केलंय. या लॉकरमधून सोनं खरेदीच्या पावत्या सापडल्या. तसंच मोठ्या प्रमाणात सोनंही आढळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com