Kolkata Case : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणात खळबळ उडवून देणारा खुलासा; मुख्य आरोपीचे आणखी १५ मुलींसोबत घाणेरडं कृत्य

Kolkata law student Case : कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी मनोजीत मिश्रानं आणखी एका मुलीनं गंभीर आरोप केला आहे. कॉलेज ट्रिपमध्ये मनोजीतने छेड काढल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
कोलकाता विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण, मुख्य आरोपीनं आणखी १५ मुलींसोबत केले होते घाणेरडे कृत्य
कोलकातामध्ये लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाला. या घटनेविरोधात संताप व्यक्त होत असून, शहरात आंदोलने करण्यात आली. (पीटीआय)पीटीआय
Published On

Kolkata law college student gangrape case : कोलकातातील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजीत मिश्रावर आणखी एका मुलीनं गंभीर आरोप केला आहे. कॉलेजच्या (Law college) ट्रिपदरम्यान मनोजीतनं छेड काढल्याचं तिनं इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. इतकंच नाही तर प्रतिकार केला असता, त्याने मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी ती कॉलेजच्या ट्रिपला गेली होती. त्यावेळी मनोजीत मिश्रा देखील त्यात होता. त्याने तिची छेड काढली. विरोध केल्यानंतर मारहाणही केली. तसेच तुझ्या आईवडिलांना आणि बहिणीचा जीव घेईल, अशी धमकीही त्याने दिली होती. याबाबत कुठेही वाच्यता करू नकोस असंही धमकावलं होतं.

पीडित विद्यार्थिनीच्या दाव्यानुसार, तिला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जायचं होतं. मात्र, मनोजीत मिश्रावर (Manojit Mishra) राजकीय वरदहस्त असल्यानं गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे प्रमुख आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचं त्याच्यावर वरदहस्त होता, असा आरोपही तिने केला. आमदाराच्या दबावामुळं कॉलेज प्रशासनही त्याला वाचवू पाहत होतं. याशिवाय त्याच्याविरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जायचे, असंही तिनं म्हटलं.

पीडितेने मनोजीत मिश्राच्या (Accused Monojit Mishra) दृष्कृत्याबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. मनोजीतच्या दुष्कृत्याची ती एकटीच बळी पडली नव्हती. तर आणखी किमान १५ विद्यार्थिनी आहेत, ज्यांच्यासोबत मनोजीतने घाणेरडे कृत्य केले होते. मात्र, बऱ्याच घटनांमध्ये पीडितांनी भीतीमुळं तक्रारी केल्या नाहीत. तर काही मुलींना राजकीय दबावामुळं तक्रारी करता आल्या नाहीत, असंही तिनं सांगितलं.

कॉलेजमध्ये (law college case) मनोजीतची एकप्रकारे दहशत होती. मुली त्याला समोर बघून रस्ता बदलायच्या. तो मुलींना उघडपणे धमक्या द्यायचा. त्याच्याविरोधात बोलण्याची कुणीही हिंमत करत नव्हता. पीडितेच्या माहितीनुसार, ती याआधीही त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली होती. मात्र, ते प्रकरण तिथेच दाबले गेले.

कोलकाता विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण, मुख्य आरोपीनं आणखी १५ मुलींसोबत केले होते घाणेरडे कृत्य
Kolkata Law College: हॉकी स्टिकनं मारलं, अब्रूचे लचके तोडले, व्हिडिओ काढला; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? पीडितेनं सगळंच सांगितलं

लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजीत मिश्राबाबत खळबळजनक माहिती समोर येत आहे. याआधी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी आणि व्हॅन तोडफोड प्रकरणी त्याला अटक झाली होती.

मनोजीत हा दक्षिण कोलकाताच्या एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तिथे त्याची सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाली होती. सिगारेट ओढत तो एटीएममध्ये जात असताना सुरक्षारक्षकानं त्याला रोखलं होतं. त्यानंतर त्यानं त्याच्यावर हल्ला केला. सुरक्षारक्षकानं १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली. काही वेळात पीसीआर व्हॅन तिथे पोहोचली. मनोजीतने पोलिसांशीही हुज्जत घातली होती. सहायक पोलीस उपनिरीक्षकालाही त्यानं मारहाण केली होती.

कोलकाता विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरण, मुख्य आरोपीनं आणखी १५ मुलींसोबत केले होते घाणेरडे कृत्य
Kolkata Law College Case : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com