Khan Sir : खान सरांच्या बॉडीगार्डनेचं केला कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार? 'त्या' व्हिडिओने उडाली खळबळ

Bihar Patna Khan Sir News : पाटण्यातील खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात व्हायरल व्हिडिओमुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार झाल्याचा दावा समोर आला असून बिहार पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
KHAN SIR FIRING CASE: VIRAL VIDEO CREATES NEW TWIST IN PATNA COACHING CENTRE SHOOTING INVESTIGATION
KHAN SIR FIRING CASE: VIRAL VIDEO CREATES NEW TWIST IN PATNA COACHING CENTRE SHOOTING INVESTIGATIONSaam Tv
Published On
Summary
  • खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाला नवे वळण

  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने खळबळ

  • सुरुवातीला खान सरांनी कोचिंग सेंटरवर गोळीबार झाल्याचा दावा केला

  • पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

Bihar Patna Khan Sir Coaching Centre Firing बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, गोळीबार नेमका कोणी केला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ज्ञान बिंदू अकादमीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरशी संबंधित बॉडीगार्डकडून गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पाटण्यातील मुसल्लापूर हाट परिसरातील खान ग्लोबल स्टडीज कोचिंग सेंटरजवळ अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान दगडफेक, तोडफोड आणि मोठ्या प्रमाणात आरडाओरड झाल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कोचिंग सेंटरच्या बाहेर अनेक लोकांची गर्दी दिसत आहे. याचदरम्यान एक व्यक्ती बंदूक लोड करताना आणि नंतर गोळीबार करताना दिसत आहे. ही व्यक्ती खान सरांचा बॉडीगार्ड असल्याचे म्हटले जात असले तरी, पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

KHAN SIR FIRING CASE: VIRAL VIDEO CREATES NEW TWIST IN PATNA COACHING CENTRE SHOOTING INVESTIGATION
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

घटनेनंतर खान सर यांनी सुरुवातीला त्यांच्या कोचिंग सेंटरवर गोळीबार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी माध्यमांशी बोलताना सुमारे दहा गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच, प्रतिस्पर्धी कोचिंग सेंटरकडून विद्यार्थ्यांना कमी फीमध्ये शिक्षण दिल्यामुळे त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

मात्र, दुसऱ्याच दिवशी खान सर यांनी आपले शब्द मागे घेतले. त्या वेळी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती आणि बॉडीगार्डकडून मिळालेल्या माहितीनुसारच आपण प्रतिक्रिया दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बिहार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हिडिओची सत्यता, गोळीबार झाला का आणि त्यामागे नेमके कोण होते याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पाटण्यातील कोचिंग क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com