Online shopping dispute: इन्स्टाग्रामवरून ड्रेस मागवला, पण डिलिव्हरीच झाली नाही; महिला थेट कोर्टात गेली, बुटीकला थेट दंड

Instagram boutique: इन्स्टाग्रामवरून ड्रेस विकणाऱ्या बुटीकविरोधात केरळ ग्राहक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. ड्रेस न पाठवल्याने आणि पैसे परत न दिल्यामुळे ग्राहकाला ₹36,880 नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिलेत.
Online shopping dispute
Online shopping disputesaam tv
Published On

केरळमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 17 जुलै रोजी एका इन्स्टाग्रामवरून व्यवसाय करणाऱ्या बुटीकविरोधात महत्त्वाचा निर्णय दिला. एका महिलेने लग्नासाठी दोन ड्रेस ऑर्डर करून त्याचे पूर्ण पैसे भरले होते. मात्र तिला केवळ एकच ड्रेस मिळाला. दुसऱ्या ड्रेसचे पैसे परत देण्याचं अनेकदा आश्वासन देऊनही बुटीकने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे आयोगाने त्या महिलेच्या बाजूने निर्णय देत बुटीकला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिलेत.

आयोगाने स्पष्ट केलंय की, एखादा विक्रेता इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वस्तू विकत असला तरी त्यालाही ग्राहक संरक्षण कायद्याचं पालन करावंच लागणार आहे. व्यवहार ऑनलाइन झाला म्हणून वस्तू न देणं किंवा ग्राहकाशी संपर्क टाळणं अशी कारणं चालणार नाहीत.

Online shopping dispute
Heart blockage: हार्टमध्ये स्टेंट कधी लावावा लागतो? हार्ट ब्लॉकेजबद्दल डॉक्टरांनी दिली संपूर्ण माहिती

काय आहे नेमकं प्रकरण?

तक्रारदार महिलेला इन्स्टाग्राम स्टोरीवर या बुटीकचे ड्रेस दिसले. त्यानंतर तिने फेब्रुवारी 2025 मध्ये दोन ड्रेस ऑर्डर केले आणि गुगल पेद्वारे एकूण 3,760 रुपये भरले. बुटीकने हे दोन्ही ड्रेस एप्रिल 2025 च्या शेवटच्या आठवड्यात मिळतील असं सांगितले होतं. हे ड्रेस तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी लागणार होते. नंतर बुटीकने डिलिव्हरीला उशीर होणार असल्याचं सांगितलं आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ड्रेस पोहोचतील असं पुन्हा आश्वासन दिलं. मात्र बुटीककडून ते देखील पाळण्यात आलं नाही.

बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर 14 मे रोजी तिला केवळ एकच ड्रेस मिळाला. दुसरा ड्रेस मात्र कधीच पाठवण्यात आला नाही. त्यानंतर महिलेच्या म्हणण्यानुसार, ड्रेसबाबत विचारणा केल्यानंतर बुटीकने तिचे फोन घेणं बंद केलं. इतकंच नाही तर तिच्या मेसेजलाही उत्तर दिलं नाही. सतत विचारणा केल्यावर ते तिच्याशी उद्धटपणे वागतअसलयाचं आले. दुसरीकडे बुटीकने दुसऱ्या ड्रेसचे 1,880 रुपये म्हणजे निम्मी रक्कम 10 जूनपर्यंत परत करू असंही सांगितलं होतं. पण ते देखील बुटीकने काही केलं नाही.

याशिवाय 21 मे रोजी व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान बुटीककडून महिलेशी उद्धटपणे बोलण्यात आलं. "पैसे परत मिळणार नाहीत, हवं असेल तर कोर्टात जा," असं तिला सांगण्यात आल्याचा आरोपही तिने केला. दरम्यान, लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे तिला दुसरीकडून अधिक पैसे मोजून नवीन ड्रेस खरेदी करावा लागला.

बुटीक आयोगासमोरच हजर झालं नाही

महिलेने बुटीकला कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, ती नोटीस 'Unclaimed' म्हणून परत आली. त्यानंतरही बुटीककडून कोणीही आयोगासमोर हजर झालं नाही. त्यामुळे आयोगाने महिलेने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच सुनावणी पुढे चालू ठेवली.

आयोगाने कोणते पुरावे तपासले?

आयोगाचे अध्यक्ष एस. के. श्रीला आणि सदस्य स्टॅन्ली हेरॉल्ड यांनी महिलेने दिलेले गुगल पेचे व्यवहाराचे पुरावे तसंच दोघांमधील मेसेजेस तपासले. त्यातून बुटीकने संपूर्ण पैसे घेतल्याचं, डिलिव्हरीबाबत वारंवार आश्वासन दिल्याचं, तारीख बदलल्याचं, उशिरा एकच ड्रेस दिल्याचं आणि दुसऱ्या ड्रेसचे पैसे परत न केल्याचं स्पष्ट झाल्याचं आयोगाने नमूद केले.

Online shopping dispute
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

सोशल मीडियावरील विक्रेत्यांनाही ग्राहक कायदा लागू

आयोगाने आपल्या निर्णयात स्पष्ट शब्दांत सांगितलं की, व्यवहार इन्स्टाग्रामवर झाला म्हणून विक्रेता जबाबदारीतून सुटू शकत नाही. ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतर वस्तू वेळेवर देणं किंवा ते शक्य नसल्यास पैसे परत करणं ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. ऑनलाइन किंवा सोशल मीडियावरून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यावर ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तितकाच लागू होतो.

आयोगाने सांगितलं की, एक ड्रेस अजिबात न पाठवणं आणि दुसरा ड्रेसही वारंवार आश्वासन देऊन खूप उशिरा देणं ही ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील कलम 2(11) नुसार सेवेतील त्रुटी आहे. त्याचप्रमाणे ग्राहकाचे पैसे घेतल्यानंतर वस्तू न देणं आणि पैसे परत करण्याचे आश्वासन देऊनही ते न देणं, ही Unfair Trade Practice असल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं.

Online shopping dispute
Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

आयोगाने संबंधित बुटीकला महिलेस एकूण 36,880 रुपये देण्याचे आदेश दिलेत. यामध्ये न मिळालेल्या ड्रेसची किंमत म्हणून 1,880 रुपये आहे. त्याचप्रमाणे मानसिक त्रास, गैरसोय आणि मनस्तापाबद्दल नुकसानभरपाई म्हणून 25,000 रुपये, तसंच न्यायालयीन खर्च 10,000 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com