Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

Jammu Kashmir Bus Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसला अपघात झाला. ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली.
Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली
Jammu Kashmir Bus AccidentSaam Tv
Published On
  • जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात भीषण अपघात

  • भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

  • बसमध्ये ५० भाविक होते

  • या अपघातामध्ये ३९ जण गंभीर जखमी झाले

  • चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला

जम्मू-काश्मीरममध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. गांदरबल जिल्ह्यातील हरिगनीवन येथे ही घटना घडली. ५० भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. अंबरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी ही अपघाताची घटना घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३९ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांदरबलच्या गुंड भागातील एस-मोड हरिगानीवान वळणावर हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि बस रस्त्यावरून घसरून थेट दरीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत. बचाव पथकांनी सर्व जखमी भाविकांना प्रथमोपचारासाठी कांगन रुग्णालयात दाखल केले. काही भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. गरज भासल्यास गंभीर जखमी भाविकांना श्रीनगरमधील मोठ्या रुग्णालयात पाठवण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! पंक्चर काढताना पिकअपला अज्ञात वाहनाची धडक; चाकाखाली चिरडून ४ तरुणांचा मृत्यू

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी संपूर्ण मार्गावर लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस तैनात आहेत. भाविकांची बस दरीत कोसळल्याची घटना कळताच बचाव आणि मदत कार्य सुरू केले. ज्यामुळे सर्व जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, भरधाव कार तलावात कोसळली; ५ जणांचा मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, जम्मू आणि काश्मीर पोलिस, यात्रा पोलिस, २ आसाम रायफल्स आणि २१ राष्ट्रीय रायफल्स यांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बचावकार्यात स्थानिक नागरिकांनी मदत केली. संपूर्ण पथकाने मिळून तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात आहे. अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना यात्रेदरम्यान सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली
Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com