Ant Smuggling: चक्क मुंग्यांची होतेय तस्करी; एका मुंगीची किंमत तब्बल १८००० रुपये, देशातील पहिलीच घटना

Ant Smuggling Know Ant Price: केनियामध्ये महाकाय आफ्रिकन हार्वेस्टर मुंग्यांची तस्करी होण्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चार तस्करांना शेकडो मुंग्यांसह अटक करण्यात आलीय.
Ant  Smuggling Know Ant Price
Messor cephalotes Ant Saamtv
Published On

आपल्या घरातील भिंतीवर किंवा मातीत मुंग्या आढळत असतात. मुंगीने चावा घेतला की अनेकजण त्यांना चिरडून मारून टकातात. पण तुम्हाला माहितीये, ज्या मुंगीला तुम्ही मारत आहात त्या मुंग्यांना मोठी किंमत आहे. हो, त्या किंमतींमुळे त्या मुंग्यांची तस्करी होत असल्याची बाब उघडकीस आलीय. एक मुंगी ५० रुपये तर कधी-कधी एका मुंगी १८,००० रुपयांना विकली जाते. दरम्यान अनेक देशात मुंग्या आणि काही कीटकांना वाचवण्यासाठी कायदे केले गेलेत.

चार व्यक्तींनी अत्यंत मागणी असलेल्या शेकडो मुंग्यांची देशाबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आलीय. ही घटना आफ्रिकन देश केनियामध्ये घडलीय. याप्रकरणी या चौघांना अटक करण्यात आलीय. केनिया वन्यप्राणी सेवा संस्थेने (KWD) ही ऐतिहासिक प्रकरण असल्याचं म्हटलंय. केव्हीडी संस्था सिंह आणि हत्ती सारखा प्राण्यांचं संरक्षण करते. आता ही संस्था सर्वाधिक मागण्या असलेल्या मुंग्यांचं संरक्षण करत आहेत.

Ant  Smuggling Know Ant Price
Indian Student : भारताला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांंचं स्वप्न भंगलं, ५ राज्यातील मुलांना प्रवेशबंदी, कारण?

एका मुंगीची किंमत १८ हजार

तस्करी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये आफ्रिकन हार्वेस्टर मुंग्यांचाही समावेश होता. या मुंग्यांची किंमत ब्रिटिश डीलर्सच्या अंदाजानुसार प्रति मुंगी £१७० पर्यंत म्हणजेच १८ हजार आहे. केडब्ल्यूएसने म्हटलंय, की हे प्रकरण गंभीर आहे. ही तस्करी पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रतिष्ठित सस्तन प्राण्यांपासून ते कमी ज्ञात प्रजातींपर्यंतच्या प्राण्याची तस्करी केली जात होती.

Ant  Smuggling Know Ant Price
Shocking Video: मित्रांसोबत मजा करायला गेला, पण परतलाच नाही! राफ्टिंग करताना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

खास पद्धतीने होत होती तस्करी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तस्करांनी हे प्राण्यांना एका खास पद्धतीने पॅक केले होते. बांधून आल्यानंतरही या मुंग्या सुमारे २ महिने जिवंत राहू शकल्या असत्या. तस्करी होणाऱ्या कीटकांची नेमकी संख्या किती आहे याची माहिती अजून समोर आली नाहीये. केडब्ल्यूएसचे प्रवक्ते पॉल उडोटो यांनी बीबीसीला सांगितले की, या प्रमाणात 'बायो- चोरी (पायरसी) 'ची ही देशातील पहिलीच घटना आहे.

या कीटकांची तस्करी केल्याबद्दल चार संशयितांना अटक करण्यात आलीय. त्यापैकी दोनजण बेल्जियन, एक व्हिएतनामी आणि एक केनियाचा आहे. गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईत त्यांना अटक करण्यात आलीय. ते युरोप आणि आशियातील विदेशी पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेत ह्या मुंग्या विकण्याचा प्रयत्न करत होते.

केडब्ल्यूएसने म्हटले आहे की दुर्मिळ कीटकांच्या प्रजातींची मागणी वाढतेय. जे लोक यांना पाळतात त्यांना फॉर्मिकॅरियम म्हणून ओळखल्या जातात. हे कीटक दुसऱ्या ठिकाणी आपला अधिवास तयार करतात. आफ्रिकन हार्वेस्टर मुंगी - किंवा मेसर सेफॅलोट्स ही तिच्या प्रजातीतील सर्वात मोठी मुंगी आहे. ही मुंगी सुमारे २० मिमी पर्यंत वाढू शकते, तर राणी मुंगी २५ मिमी पर्यंत वाढू शकते. तर कीटक-व्यापार वेबसाइट बेस्ट अँट्स यूकेचे जनरल मॅनेजर पॅट स्टॅनचेव्ह म्हणतात की, त्यांचा "मोठा आणि सुंदर आकार" असतो, तो आकार लोकांना आकर्षित करतात. या मुंग्यांना लोक पाळीव प्राणी म्हणून ठेवू इच्छितात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com