Suraj Revanna Arrested: प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरजला अटक , जेडीएस कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप

Karnataka Sex Scandal Case: जनता दल-सेक्युलरचे आमदार सूरज रेवन्ना यांना अटक करण्यात आली आहे. सूरज रेवन्ना हे प्रज्वल रेवन्ना यांचे भाऊ असून त्यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आले आहेत.
Suraj Revanna Arrested: रेवन्ना कुटुंबाचे पाय आणखी खोलात, सेक्स स्कँडल प्रकरणात सुरज रेवन्ना यांना अटक
Suraj Revanna ArrestedSaam Tv

प्रमोद जगताप, दिल्ली

जनता दल-सेक्युलर पक्षाचे आमदार सूरज रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूरज रेवन्ना हे प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ असून त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. प्रज्वलवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सूरजला पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना आधीच अटकेत आहेत. अशामध्ये आता त्यांच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रेवन्ना कुटुंबांचे पाय आणखी खोलात अडकल्याचे म्हटले जात आहे.

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात काही दिवसांपूर्वी जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या भावालाही लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ सूरज यांना कर्नाटक पोलिसांनी आज अटक केली. सूरज यांच्यावर शनिवारी लैंगिक छळाचा गुन्हा करण्यात आला होता. जेडीएस पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्याने सूरज यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

जेडीएस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने कर्नाटक पोलिसात तक्रार देताना दावा केला आहे की, १६ जून रोजी आमदार सूरज रेवन्ना यांनी त्याला त्याच्या फार्महाऊसवर बोलावून त्यावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी सूरज रेवन्ना यांच्याविरोधात गुन्हा दखल करून आज त्यांना अटक केली. या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

सेक्स स्कँडल प्रकरणात रेवन्ना कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. हसन लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या प्रज्वल रेवन्ना यांना ३१ मे रोजी जर्मनीहून परतल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली होती. प्रज्ज्वल यांच्यावर बलात्कार आणि धमकीचे गुन्हे दाखल आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनाही अटक झाली होती मात्र ते जामिनावर बाहेर आले आहेत.

Suraj Revanna Arrested: रेवन्ना कुटुंबाचे पाय आणखी खोलात, सेक्स स्कँडल प्रकरणात सुरज रेवन्ना यांना अटक
Chhattisgarh News: पतीने पाय दाबून दिले नाहीत म्हणून पत्नीने संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

पोलिसांनी सांगितले होते की, शनिवारी जेडीएसचे आमदार सूरज रेवन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती की, होलेनारसीपुराचे आमदार एचडी रेवन्ना यांचा मोठा मुलगा सूरज रेवन्ना यांनी १६ जून रोजी संध्याकाळी होलेनारसीपुरा तालुक्यातील घनिकाडा येथील त्यांच्या फार्महाऊसवर लैंगिक अत्याचार केले होते. त्याच्या तक्रारीनंतर सूजर रेवन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

Suraj Revanna Arrested: रेवन्ना कुटुंबाचे पाय आणखी खोलात, सेक्स स्कँडल प्रकरणात सुरज रेवन्ना यांना अटक
Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये पूल कोसळला, आठवडाभरातील दुसरी घटना; VIDEO होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com