मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

Karnataka CM Leadership Change Latest News February 26 Meeting: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले असून सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे.
Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar amid rising speculation over Karnataka leadership change ahead of the February 26 high command meeting in Delhi.
Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar amid rising speculation over Karnataka leadership change ahead of the February 26 high command meeting in Delhi.Ai
Published On

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची उघडपणे मागणी केली आहे. डी.के. शिवकुमार 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लिंगायत आणि वोक्कालिगा मतदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे.

Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar amid rising speculation over Karnataka leadership change ahead of the February 26 high command meeting in Delhi.
३२ वर्षांची साथ सोडली, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; राजकारणात मोठी उलथापालथ

रविवारी काँग्रेस आमदार एच.ए. इक्बाल हुसेन यांनी नेतृत्व बदलाच्या मागणीला दुजोरा देत म्हटले की, आम्हाला बदल हवा आहे. इतरांनाही संधी द्यावी, अशी आमची भूमिका आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊनच आम्ही हा बदल सुचवत आहोत. हायकमांडने नेतृत्व बदलाबाबत असलेला संभ्रम लवकर दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. माझ्यासह अनेक आमदार आणि मंत्र्यांची हीच भूमिका आहे. कोणताही संभ्रम न ठेवता याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar amid rising speculation over Karnataka leadership change ahead of the February 26 high command meeting in Delhi.
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना 26 फेब्रुवारी रोजी पुन्हा दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, सिद्धारमैया गटाने मुख्यमंत्री बदलाची मागणी सातत्याने फेटाळून लावली आहे, तर शिवकुमार गटाने नेतृत्व बदलावर ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्याचा आग्रह धरल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar amid rising speculation over Karnataka leadership change ahead of the February 26 high command meeting in Delhi.
CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

दरम्यान, काँग्रेस हायकमांडसमोर राजकीय समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे. शिवकुमार यांना पाठिंबा दिल्यास सिद्धारमैया यांच्याशी जोडलेल्या लिंगायत आणि अल्पसंख्याक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. उलट सिद्धारमैया यांनाच कायम ठेवल्यास शिवकुमार यांच्याशी संबंधित वोक्कालिगा समाज आणि संघटनात्मक यंत्रणेचा उत्साह कमी होण्याची भीती आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चर्चेत सहभागी करून सामूहिक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. 26 फेब्रुवारीच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनाही चर्चेसाठी बोलावले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com