Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Kanpur Crime News: कानपूरमधील कोयला नगरच्या हॉटेल ट्विंकल गॅलेक्सीमध्ये, रिसेप्शनिस्ट तरुणीने नकार दिल्यामुळे हॉटेल मालकाने तिला सहा तास ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे.
KANPUR HOTEL OWNER ARRESTED FOR RAPE AFTER PROPOSAL REJECTION
KANPUR HOTEL OWNER ARRESTED FOR RAPE AFTER PROPOSAL REJECTION
Published On
Summary
  • कोयला नगर येथील ‘ट्विंकल गॅलेक्सी’ हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टवर बलात्कार

  • आरोपी मनोज पटेलने प्रेम नाकारल्याचा सूड घेतला

  • महिला सहा तास ओलीस ठेवल्यानंतर सोडण्यात आली

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला

कानपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजवली आहे. कोयला नगर येथील ‘ट्विंकल गॅलेक्सी’ हॉटेलच्या मालकावर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट मुलीला बंदी ठेवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रेमाने केलेला प्रपोज नाकारल्याचा सूड घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं?

चकेरी पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, २१ वर्षीय पीडित महिला गेल्या वर्षभरापासून ‘ट्विंकल गॅलेक्सी’ हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. हॉटेल मालक मनोज कुमार पटेल हा आदर्श विहार येथे राहत होता. हा काही काळापासून तिच्यावर प्रेम व्यक्त करत होता. महिलेवर जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, महिलेनं हा प्रपोज नाकारल्याने आरोपी संतापला आणि सूडाच्या भावनेतून तिला जबरदस्तीने एका खोलीत ओढून नेले.

KANPUR HOTEL OWNER ARRESTED FOR RAPE AFTER PROPOSAL REJECTION
Shocking: सरपंचाच्या अंत्यसंस्कारासाठी गावात आला, ४ वर्षाच्या मुलीवर पडली नजर, बलात्कार करत...

२२ ऑक्टोबरच्या बुधवारी रात्री उशिरा मनोज पटेलने पीडित महिलेला हॉटेलमधील एका खोलीत नेले. तिचे हातपाय दोरीने बांधले, तोंडात कापड ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्यावर मारहाण केली. तब्बल सहा तास आरोपीने तिला जवळ ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. नंतर तिला धमकी देत सोडून दिले. जर तिने कोणाला सांगितले तर तिची बदनामी केली जाईल.

KANPUR HOTEL OWNER ARRESTED FOR RAPE AFTER PROPOSAL REJECTION
Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

या घटनेनंतर महिलेनं धैर्याने जाऊन चकेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत मनोज पटेलविरुद्ध बलात्कार, जवळीक साधणे आणि धमकावणे यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या शोध मोहिमेदरम्यान आरोपीला पीएसी मोड बायपास परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्रकरणातील सर्व तपास पोलीस निरीक्षक संतोष कुमार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com