Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

bangalore shocking news :दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
bangalore shocking
bangalore shocking news Saam tv
Published On
Summary

बेंगळुरुत महिलेवर सामूहिक अत्याचार

अत्याचाराच्या घटनेने परिसरात खळबळ

पोलिसांकडून ३ आरोपींना अटक

बेंगळुरुच्या ग्रामीण भागातील गंगोदनहल्ली गावातून धक्दादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावात नराधमांनी दारुच्या नशेत घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. या तरुणांनी बुधवारी रात्री ९.३० वाजेपासून १२.१५ वाजेपर्यंत महिलेवर अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण गावात खबळ उडाली आहे.

bangalore shocking
आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दारुच्या नशेत होते. त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर महिलेने दरवाजा उघडल्यानंतर बळजबरीने घरात घुसले. त्यांनी एका खोलीत नेऊन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला.

पीडित महिला मूळची कोलकाता येथील आहे. ती बेंगळुरूत भाड्याच्या घरात राहत होती. अत्याचाराची घटना घडल्यानंतर महिलेने तातडीने मदनायकनहल्ली पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

bangalore shocking
Crime : भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; माजी आमदारासहित १२ जणांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अत्याचारानंतर महिलेचे दोन मोबाइल आणि रोख २५००० रुपये लुटले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

bangalore shocking
Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरु आहे. पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे. या आरोपींनी महिलेली भीती दाखवून अत्याचार केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

परभणीतही सहा जणांकडून तरुणीवर अत्याचार

महाराष्ट्रातील परभणीच्या जिंतूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली. एका तरुणीवर ६ जणांनी सामूहिक अत्याचार केला. जंगलात फिरायला आलेल्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं. त्यानंतर या ६ जणींनी अत्याचार केला. त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांच्याजवळील ५ हजार रुपयेही हिसकावून घेतले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. पोलिसांनी आरोपींनाही अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com