Crime : भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; माजी आमदारासहित १२ जणांना अटक

odisha Crime news : भाजप नेता हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. या प्रकरणात माजी आमदारासहित १२ जणांना अटक करण्यात आलीये.
odisha Crime
odisha Crime news Saam tv
Published On
Summary

भाजप नेते पीताबास पांडा यांच्या हत्येप्रकरणात १२ जणांना अटक

या प्रकरणात माजी आमदार विक्रम पांडा आणि माजी महापौर सिबा शंकर दास यांचा समावेश

पांडा यांच्या हत्येकरिता ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर

या प्रकरणावरून भाजप आणि बीजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु

ओडिशा पोलिसांनी बुधवारी भाजप नेते आणि वकील पीताबास पांडा यांच्या हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट दिली. या प्रकरणात ब्रम्हपूरचे माजी आमदार, बीजू जनता दलाचे गंजम जिल्हाध्यक्ष बिक्रम पांडा यांच्यासहित १२ लोकांना पोलिसांनी अटक केली. मात्र, बीजेडने या अटकेचा विरोध केला होता. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप बीजेडीने केला होता. तर बीजेडी आरोपींना संरक्षण देत आहे, असा आरोप भाजपने केला.

ब्रम्हपूरचे पोलीस अधिकारी विवेक एम यांनी माध्यमांना सांगितलं की, राजकीय वैर,वैयक्तिक वैमनस्यातून पांडा यांची हत्या करण्यात आली आहे'. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ब्रम्हपूरचे माजी महापौर सिबा शंकर दास(पिंटू), नगरसेवक मलय बिशोयी आणि इतर साथीदारांचा समावेश आहे.

odisha Crime
Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवला

ज्येष्ठ वकील आणि ओडिशा स्टेट बार कौन्सिलचे सदस्य पिताबास पांडा यांची ६ ऑक्टोबर रोजी ब्रम्हपूर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाबाबत सांगण्यात आलं की, पिताबास पांडा यांची हत्या करण्यासाठी ५० लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. यासाठी गोळीबार करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्यात आले होते.

odisha Crime
Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

बीजेडी नेत्या प्रमिला मलिक यांनी या प्रकरणात विक्रम पांडा यांना क्लीन चिट दिली आहे. पोलीस खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ब्रम्हपूरच्या माजी आमदाराला अटक केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

odisha Crime
Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री सुरेश पुजारी यांनी बीजेडीवर गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'गुन्हेगार आणि गुन्हेगारीला पाठिंबा देऊन बीजेडी ओडिशावर अन्याय करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com