
भाजपकडून सांगोला परिसरात पक्षवाढीचे प्रयत्न
काही माजी आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे
राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलसाठी दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर दौरा सुरु आहे
महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आणि पक्ष फोडण्याचे राजकारण उघड
पंढरपूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आज सोलापूर दौरा झाला. यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या माजी आमदारांना अजित पवारांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठी मदत केली असा दावा ही भरणे यांनी केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर भाजप पक्ष विस्ताराचा जोरदार धमाका सांगोल्यातूनं सुरू केला आहे. याचा अधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे पुत्र रणजीत शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे हे टार्गेटवर आहेत. यातील काही जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आहे.
आता या माजी आमदारांना थांबवण्यासाठी राष्ट्रवादी कडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याला रणजीत शिंदे वगळता इतरांनी मात्र दांडी मारल्याचे दिसून आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी आमदार बबन शिंदे आणि रणजीत शिंदे यांचं नाव घेत अजित पवारांनी तुम्हाला काय काय मदत केली याची आठवण करून देत अजित पवाराना साथ देण्याची साद ही घातली. आता भरणे यांच्या डॅमेज कंट्रोल दौऱ्याचा कितपत परिणाम होतो. येणाऱ्या काळात कळेल.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शत प्रतिशत भाजप करण्याचा अश्व रोखण्यात राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना कितपत यश येणार पहावे लागणार आहे. दरम्यान महायुती मधेच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.