Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

Maharashtra Officer Promotion update : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली आहे. आज कुणाची कुठे बढती झाली, जाणून घ्या.
Maharashtra Officer Promotion list update
Maharashtra Officer Promotion list Saam tv
Published On
Summary

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट

ऐन दिवाळीत सनदी अधिकाऱ्यांना बढती

अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : ​दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यामध्ये २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला. आज सोमवार, (दि. २०) रोजी याबाबतचे शासन आदेश जारी केले.

अनेक लोकाभिमुख योजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महसूली अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही हा कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच त्यांना नवीन वेतनश्रेणी लागू होईल.

Maharashtra Officer Promotion list update
Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढतो आणि कामाला गतीही मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक सरकार आणि गतिमान प्रशासन देण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे. या बढतीमुळे अनेक अधिकाऱ्यांचा आयएएस होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दिवाळीतच त्यांची पद्दोन्नती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या अधिकाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यात आम्हाला यश आले, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Maharashtra Officer Promotion list update
Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

पदोन्नती मिळालेले अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)

प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक)

किरण बापु महाजन (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नांदेड)

रवीकांत कटकधोंड (खाजगी सचिव, मा. मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे)

प्रदिप प्रभाकर कुलकर्णी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, गोंदिया)

जगन्नाथ महादेव विरकर (सदस्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

शिवाजी व्यंकटराव पाटील (विशेष कार्य अधिकारी, अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, मुंबई)

दीपाली वसंतराव मोतीयेळे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, भंडारा)

संजय शंकर जाधव (अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), अमरावती विभाग, अमरावती)

प्रताप सुग्रीव काळे (अपर आयुक्त क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)

निशिकांत धोंडीराम देशपांडे (मा. राज्यपालांचे प्रबंधक, राजभवन, मुंबई)

सुहास शंकरराव मापारी (प्रशासकीय अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय)

मोनिका सुरजपालसिंह ठाकूर (अतिरिक्त आयुक्त, (पिंपरी चिंचवड) महानगरपालिका, पुणे)

स्नेहल हिंदूराव पाटील भोसले (निबंधक, सारथी, पुणे)

मंदार श्रीकांत वैद्य (खाजगी सचिव, मा. मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, मंत्रालय, मुंबई)

सरिता सुनिल नरके (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सांगली)

​डॉ. राणी तुकाराम ताटे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर)

मृणालिनी दत्तात्रय सावंत (सहयोगी प्राध्यापक, यशदा, पुणे)

पांडुरंग शंकरराव बोरगांवकर (कांबळे) (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, लातूर)

नरेंद्र सदाशिवराव फुलझेले (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, बुलढाणा)

सुषमा वामन सातपुते (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, कोल्हापूर)

अरूण बाबुराव आनंदकर (अतिरिक्त महासंचालक, महाऊर्जा, पुणे)

रिता प्रभाकर मेत्रेवार (अपर आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर)

वंदना साहेबराव सूर्यवंशी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जालना)

Maharashtra Officer Promotion list update
Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

पदोन्नती झालेले अप्पर जिल्हाधिकारी पुढीलप्रमाणे*

मारुती भिकाजी बोरकर - अपर जिल्हाधिकारी, बार्टी, पुणे

श्रावण श्रीरंग क्षीरसागर - अपर जिल्हाधिकारी, परभणी

राजेंद्र मारुती खंदारे - प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई (प्रपत्र पदोन्नती)

हेमंत विठ्ठल निकम - उप संचालक, भूमि अभिलेख, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे (श्री राजेंद्र गोळे यांच्या बदलीने रिक्त पदावर)

अविनाश हरिश्चंद्र रणखांब - खाजगी सचिव, मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद (प्रपत्र पदोन्नती)

तुकाराम देवराम हुलवळे - अपर जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई

अविनाश दशरथ शिंदे - प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर

सुदाम अमरसिंग परदेशी - उपायुक्त (रोहयो) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

निलेश चंद्रकांत जाधव - सह आयुक्त (करमणूक) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

सुजाता प्रितम गंधे-क्षीरसागर - सक्षम प्राधिकारी, मुंबई-नागपूर, झारसुगुडा पाईप लाईन प्रकल्प, भूसंपादन, नागपूर (प्रपत्र पदोन्नती)

रत्नदिप रामचंद्र गायकवाड - अपर जिल्हाधिकारी, नांदेड

नितीनकुमार भिकाजी मुंडावरे - अपर जिल्हाधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

विजया विनायक बनकर - उपायुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर

Maharashtra Officer Promotion list update
Bihar Election : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडली; आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

अंजली अभयकुमार धानोरकर - सह आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर

नंदकुमार माधव कोष्टी - उपायुक्त (पुनर्वसन) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे (श्री विकास गजरे यांच्या बदलीने रिक्त पदावर)

सतिश ज्ञानदेव राऊत - अपर जिल्हाधिकारी, पुणे

अजय उत्तम पवार - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई

रमेश कारभारी मिसाळ - अपर जिल्हाधिकारी, जालना

अभिजित भालचंद्र घोरपडे - संचालक, राज्य वातावरणीय कृती कक्ष (पद उन्नत करून)

अजित प्रल्हाद देशमुख - खाजगी सचिव, मा.मंत्री, (को.रो.उ.ना) (प्रपत्र पदोन्नती)

गणेश केशव नि-हाळी - अपर जिल्हाधिकारी, सोलापूर

संजय बाबुराव तेली - अपर जिल्हाधिकारी, वर्धा

वासंती मारुती माळी - सह आयुक्त (करमणूक), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती (श्री संतोष भोर यांच्या बदलीने रिक्त पदावर)

संदीप जयवंतराव कोकडे-पवार - प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, बेलापूर नवी मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com