Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Uttar pradesh Shocking :सुतळी बॉम्ब फोडणे तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. ऐन दिवाळीत चुकीच्या पद्धतीने सुतळी बॉम्ब फोडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Shocking news
Uttar pradesh Shocking Saam tv
Published On
Summary

गौतम बुद्ध नगरमधील छिजारसी कॉलनीत दिवाळीच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

२० वर्षीय तरुण स्टील ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडताना घडला अपघात

स्टील ग्लासचे तुकडे शरीरात घुसल्यामुळे तरुणाचा मृत्यू

रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. फटाके फोडताना केलेल्या एका चुकीने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गौतम बुद्ध नगरच्या छिजारसी कॉलनीत ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुण स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडायला गेला. त्यावेळी स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले. हे तुकडे तरुणाच्या थेट शरीरात घुसले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Shocking news
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगरच्या नोएडा सेक्टर ६३ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छिजारसी कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाची यंदाची दिवाळी शेवटची ठरली. हा तरुण सुतळी बॉम्ब स्टीलच्या ग्लासखाली ठेवून फोडत होता. त्याचवेळी सुतळी बॉम्ब फुटल्याने स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले. त्यानंतर या ग्लासचे टोकदार तुकडे तरुणाच्या शरीराच्या विविध भागात घुसले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने नोएडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तरुणाचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवा असे या तरुणाचे नाव आहे.

Shocking news
India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

२० वर्षीय शिवा हा आई-वडील आणि बहिणीसोबत बिलाल मशिदीजवळील एका गल्लीत राहत होता. त्याचे वडील विनोद हे मूळचे पीलीभीत जिल्ह्यातील कंजा गावाचे रहिवासी आहेत. शिवाचे वडील आणि त्यांची आई खासगी कंपनीत काम करतात. ऐन दिवाळीत पदवीचं शिक्षण घेणाऱ्या शिवाचा मृत्यू झालाय. शिवाच्या मृत्यूमुळे हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com