Shocking: सरपंचाच्या अंत्यसंस्कारासाठी गावात आला, ४ वर्षाच्या मुलीवर पडली नजर, बलात्कार करत...

Rajasthan Crime News: राजस्थानच्या भरतपूरमधील २३ वर्षीय तरुणाला जोधपूरमध्ये चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बुधवारी अटक केली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
RAJASTHAN SHOCK 4-YEAR-OLD GIRL RAPED IN JODHPUR’S BILARA
RAJASTHAN SHOCK 4-YEAR-OLD GIRL RAPED IN JODHPUR’S BILARASaam Tv
Published On
Summary
  • बिलारा येथे ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.

  • आरोपी २३ वर्षीय JCB ऑपरेटर असून पोलिसांच्या ताब्यात.

  • परिसरात संताप व्यक्त, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.

  • POCSO कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील बिलारा तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे केवळ ४ वर्षांच्या चिमुरडीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला फसवले.

धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास ९ वाजता हा घडली. घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला तत्काळ बिलारा येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जोधपूर येथील सरकारी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

RAJASTHAN SHOCK 4-YEAR-OLD GIRL RAPED IN JODHPUR’S BILARA
Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

या प्रकरणाने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत निषेध आंदोलन केले आणि परिसरातील बाजारपेठा बंद ठेवल्या. लोकांनी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ‘POCSO’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

RAJASTHAN SHOCK 4-YEAR-OLD GIRL RAPED IN JODHPUR’S BILARA
Shocking: ५ मुलांची आई प्रेमात पडली, नवऱ्याने नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत पकडले, पुढे जे झालं ते वाचून थरकाप उडेल

आरोपी हा JCB मशीन ऑपरेटर असल्याची माहिती समोर आली असून, तो पूर्वी मुलीच्या गावातच काम करत होता. अलीकडेच गावातील माजी सरपंचाच्या निधनानिमित्त तो पुन्हा गावात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान हेही उघड झाले की आरोपी मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता. म्हणूनच त्यांच्याशी जवळीक साधून त्याने ही घृणास्पद कृती केली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची हमी देत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे समाजात बालकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. नागरिक न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com