Jharkhand Election: झामुमोने महुआला रांचीतून दिली उमेदवारी; JMM ची दुसरी लिस्ट जाहीर

JMM Candidate Second List: झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
Jharkhand Election: झामुमोने महुआला रांचीतून दिली उमेदवारी; JMM ची दुसरी लिस्ट जाहीर
JMM Candidate Second List
Published On

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून तेथील राजकारणाला वेग आलाय. राजकीय पक्षांनी आपआपल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवलाय. याच दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. झारखंडची राजधानी रांचीमधून झामुमोने महुआ मांझी यांना उमेदवारी दिलीय.

महुआ मांझी ह्या राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांना झामुमोने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. महुआ मांझी या महान हिंदी साहित्यिकीचं नाव समाजसेवेच्या क्षेत्रात घेतले जाते. हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात त्या खास मानल्या जातात. यापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाने मंगळवारी रात्री उशिरा ३५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. झामुमोने आतापर्यंत ३६ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

कोण आहे महुआ मांझी?

JMM च्या महुआ मांझी या राज्यसभेच्या खासदार झालेल्या पहिल्या महिला सदस्या आहेत. त्या झारखंड महिला आयोगाच्या प्रमुखही होत्या. याआधीही त्यांनी २०१४-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रांचीमधून नशीब आजमावले होते, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या बऱ्याच काळापासून झामुमोशी संबंधित आहेत.

झारखंड विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

याआधी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत थेट ६६ उमेदवार जाहीर केलेत. या यादीत भाजपने दिग्गज नेत्यांना संधी दिली आहे. भाजपने पहिल्या यादीत चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी दिली आहे. तर बाबुलाल मरांडी यांना धनवारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करताच तेथील राजकारण तापलंय. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर या निवणडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com