Jharkhand Well Incident: विहिरीत पडलेल्या वासराला वाचवायला गेले, ६ जणांनी गमावला जीव; नेमकं काय घडलं?

Jharkhand Well Incident Update: या घटनेत एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jharkhand Well Incident
Jharkhand Well IncidentSaam Tv
Published On

Jharkhand News: झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रांचीपासून ७० किलोमीटर दूर असलेल्या सिल्ली प्रखंडच्या पिस्का गावात विहिरीत पडलेल्या वासराला वाचवताना ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Jharkhand Well Incident
Loksabha Election 2024: ठरलं तर मग! राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार, काँग्रेस लागली कामाला

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आनंद मांझी नावाच्या गावकऱ्याचे वासरु विहिरीमध्ये पडले. त्याला वाचवण्यासाठी 7 जण विहिरीत उतरले. दुसरी व्यक्ती विहिरीच्या बाजूला उभी राहून त्यांना मदत करत होती. त्यानंतर अचानक विहिरीच्या वरच्या बाजूला असलेली माती आणि दगड अचानक विहिरीमध्ये कोसळली. वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेले सर्व जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

Jharkhand Well Incident
Man Shoot Women in Toilet: Burqa घालून लेडीज टॉयलेटमध्ये घुसायचा आणि व्हिडीओ बनवायचा; पितळ उघड पडताच घडलं भयंकर...

आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि दोघांचे प्राण वाचवले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली. गुरुवारी मध्यरात्री दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर शुक्रवारी चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Jharkhand Well Incident
Moon Photos From Chandrayaan-3 : चांद्रयान-3 ने पाठवले चंद्राचे अगदी जवळचे फोटो, ISROने शेअर केले दोन VIDEO

तब्बल २० तास एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य करण्यात आले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सिल्लीचे डीएसपी क्रिस्टोफर केरकेटा यांनी सांगितले की, विहिरीत खूप मलबा जमा झाला होता त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, 'पिस्का गावात विहिरीत पडून 6 जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद बातमी आहे. देव मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com