ट्रेनला आग लागल्याची अफवा, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बाहेर उड्या; चौघांचा जागीच मृत्यू
Jharkhand intercity express fire rumorsSaam TV

Shocking News : ट्रेनला आग लागल्याची अफवा, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बाहेर उड्या; चौघांचा जागीच मृत्यू

Jharkhand intercity express fire rumous : काहींनी जीव वाचवण्यासाठी थेट धावत्या ट्रेनमधून बाहेर उड्या घेतल्या. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले.
Published on

झारखंडच्या लातेहारमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. रांची-सासाराम इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा काहींनी पसरवली. यामुळे प्रवाशांनी मोठी आरडाओरड सुरू केली. काहींनी जीव वाचवण्यासाठी थेट धावत्या ट्रेनमधून बाहेर उड्या घेतल्या. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले.

ट्रेनला आग लागल्याची अफवा, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बाहेर उड्या; चौघांचा जागीच मृत्यू
Italy Parliament Fight Video: लाथाबुक्यांनी तुफान हाणामारी; संसदेचे 'आखाड्या'त रूपांतर, इटलीत खासदारांमध्ये जोरदार राडा VIDEO

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून चौघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासाराम-रांची इंटरसिटी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुमंदीह स्टेशनजवळ आली. यावेळीट ट्रेनमधील एका प्रवाशाने आग लागल्याचं सांगत आरडाओरड सुरू केली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

अनेक जण धास्तावले काहींनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून बाहेर उड्या घेतल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याचं कळतंय. ही अफवा नेमकी कुणी पसरवली याचा शोध घेतला जात आहे.

ट्रेनला आग लागल्याची अफवा, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बाहेर उड्या; चौघांचा जागीच मृत्यू
Rain Hits Sikkim: सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका, जनजीवन विस्कळीत; ९ लोकांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com