Shocking : सियानंतर उर्मिलाचं हादरवणारं कृत्य! तरुणीचा भावोजीवर जीव जडला, लग्नाच्या ३ दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं

Jharkhand Crime News : झारखंडमध्ये लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी तरुणी आणि तिच्या कथित प्रियकर भावोजीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
JHARKHAND SHOCKER: BRIDE-TO-BE KILLS FIANCÉ THREE DAYS BEFORE WEDDING, BROTHER-IN-LAW ARRESTED
JHARKHAND SHOCKER: BRIDE-TO-BE KILLS FIANCÉ THREE DAYS BEFORE WEDDING, BROTHER-IN-LAW ARRESTEDSaam Tv
Published On
Summary
  • झारखंडमध्ये पुणे चेतन अगरवाल घटनेची पुनरावृत्ती

  • लग्नाच्या ३ दिवस आधी तरुण बेपत्ता

  • जंगलात सापडला मृतदेह

  • होणाऱ्या बायकोने आणि तिच्या बॉयफ्रेंड घेतला जीव

  • पोलीस तपास सुरु

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजे असतानाच आता झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचं लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना तिने होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे तिचे तिच्या भावोजीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरुणी आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपींची नावे उर्मिला कुमारी आणि सुभाष पासवान अशी आहेत, तर मृत तरुणाचे नाव नीरज हाजरा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरीडीह जिल्ह्यातील भिखोडीह गावात राहणारा २१ वर्षीय नीरज हाजरा हा ५ जुलै रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला; मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर नीरजच्या वडिलांनी स्थानिक पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला हे प्रकरण किरकोळ वाटत होते, मात्र नातेवाईकांनी अपहरणाचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला.

JHARKHAND SHOCKER: BRIDE-TO-BE KILLS FIANCÉ THREE DAYS BEFORE WEDDING, BROTHER-IN-LAW ARRESTED
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

गिरीडीहचे पोलीस अधीक्षक डॉ. विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी नीरजच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इतर पुराव्यांचा अभ्यास केला. तपासादरम्यान धागेदोरे बिहारमधील जमुई जिल्ह्यातील बेला जंगलापर्यंत पोहोचले. तेथे काही दिवसांपूर्वी सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख नंतर नीरज हाजरा अशी पटली.

JHARKHAND SHOCKER: BRIDE-TO-BE KILLS FIANCÉ THREE DAYS BEFORE WEDDING, BROTHER-IN-LAW ARRESTED
Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. या चौकशीत नीरजच्या होणाऱ्या बायकोचा जबाब पोलिसांना खटकला. त्यांनी तिच्याकडून केलेल्या गुन्ह्याची कबुली वदवून घेतली. आरोपी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असून नीरजसोबत ती जबरदस्ती लग्न करत असल्याचे तिने म्हटले. प्रेमसंबंधात अडथळा बनणाऱ्या नीरजला भावोजीच्या मदतीने संपवल्याचे आरोपी तरुणीने म्हटले. पोलिसांच्या माहितीनुसार, उर्मिलाला हे लग्न मान्य नव्हते, तर सुभाषलाही तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न होणे नको होते. त्यामुळे दोघांनी मिळून नीरजला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. त्यानुसार नीरजची हत्या करून मृतदेह बिहारमधील जंगलात टाकण्यात आला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com