
देवघरमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघातात
अपघातामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या १८ भाविकांचा मृत्यू
अपघातामध्ये ३० जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू
जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
झारखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भाविकांच्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १८ भाविकांचा मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना झारखंडच्या देवघर-बासुकीनाथ मगहामार्गावरील जमुनिया चौक येथे घडली. हे सर्व भाविक श्रावण महिना असल्यामुळे बाबा वैद्यनाथ धाम येथे सुरू असलेल्या कावड यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, देवघरच्या जनुनिया चौक येते भाविकांच्या बसला ट्रकने धडक दिली. अपघाताची ही घटना आज सकाळी घडली. हा अपघात इकता भीषण होता की यामध्ये १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघरमध्ये श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रकच्या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला. बाबा वैद्यनाथजी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवोत.'
दरम्यान, बस-ट्रक अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना देवघरमधील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघातामध्ये बसचा चुराडा झाला. अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.