

जपानमध्ये मोठा भूकंप
७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले
जमीन हादरल्याचे व्हिडीओ समोर आले
भूकंपानंतर किनारपट्टी भागांसाठी त्सुनामीचा इशारा
जपानमध्ये मोठा भूकंप आला. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूवरील कुमामोटो येथे मंगळवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जपानमधील जमीन हादरली. घाबरून नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळणार असून अनेक फूट उंच लाटा येण्याची शक्यता आहे. स्थानिक यंत्रणांनी जपानमधील ७ प्रदेशांना भूकंपाचा इशारा दिला आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांनी समुद्र आणि किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचे असे आवाहन केले.
टोकियोपासून जवळपास ९०० किमी अंतरावर असलेल्या कुमामोटोच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या अरियाके उपसागरासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. २०१६ मध्ये कुमामोटोमध्ये आलेल्या एका मोठ्या भूकंपात ५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. १८०० नागरिक जखमी झाले होते. या भूकंपाच्या धक्क्यामध्ये हजारो घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
यात्सुहिरो, उटो, माशिकी आणि मिसाटो येथे शिंदो स्केलवर ६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा आणि मियाझाकी येथे ५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू उकीच्या १० किमी खाली असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर कुमामोटोमध्ये ४५,६०० धरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.