Jantar Mantar Viral Girl: 'आज माझा वाढदिवस आहे, मला माफ करा...'; वादग्रस्त विधानांनंतर अल्पवयीन मुलीची पहिली प्रतिक्रिया

Jantar Mantar Viral Girl Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अल्पवयीन मुलीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत माफी मागितली. धमक्या मिळत असल्याचा दावा करत मोदींचे आभारही मानले.
Jantar Mantar Viral Girl
Jantar Mantar Viral GirlSaam Tv
Published On

Jantar Mantar Viral Girl Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अल्पवयीन मुलगी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तिने पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करत आपण कोणाच्याही दबावाखाली माफी मागितलेली नसून ती मनापासून मागितली असल्याचे स्पष्ट केले. तसेच, या घटनेनंतर आपल्याला सतत धमक्या मिळत असल्याचा दावाही तिने केला.

'एबीपी न्यूज'शी संवाद साधताना ती म्हणाली, "आज माझा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला माफ करून माझ्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट दिली आहे." ती पुढे म्हणाली की, हे प्रकरण इतके मोठे होईल, याची तिला अजिबात कल्पना नव्हती. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मला त्याबद्दल खूप पश्चात्ताप होत आहे. मी कोणाच्याही दबावाखाली नाही, तर स्वतःहून आणि मनापासून माफी मागितली आहे," असे तिने सांगितले.

Jantar Mantar Viral Girl
Veen Doghantali hi Tutena: समर-स्वानंदी गेले नाटक पाहायला; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वप्नील जोशीची एन्ट्री

या घटनेबाबत अधिक माहिती देताना तिने सांगितले की, वाढदिवसानिमित्त कपड्यांची खरेदी करण्यासाठी ती एका मैत्रिणीसोबत दिल्लीतील कनॉट प्लेस येथे गेली होती. त्यावेळी काही युट्यूबर्स आणि उपस्थित लोकांनी तिला काही बोलण्यास सांगितले. त्याच वेळी तिच्याकडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर झाला. मात्र, आपली चूक लक्षात येताच दुसऱ्याच दिवशी तिने सार्वजनिकरीत्या माफी मागितल्याचेही तिने स्पष्ट केले.

Jantar Mantar Viral Girl
Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

"मला सतत धमक्या येत आहेत. काही लोक आमच्या घरी येत आहेत. पोलिसही वारंवार भेट देत आहेत. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत," असे ती पुढे म्हणाली. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेत असून भविष्यात चांगले करिअर घडवण्याची इच्छा असल्याचेही तिने सांगितले.

यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, "मला माफ केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. ही माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे," असे म्हटले. तसेच, लहान मुलांनी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक जबाबदारीने वागावे, असे मतही तिने व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com