

कोर्टानं अटी शर्ती लागू केल्या असल्या तरी CJPचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करण्याची तयारी सीजेपीनं केलीय. कायदेशीर सल्ल्यानंतर CJPच्या नेत्यांनी दिल्लीतील पार्लमेंटरी स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे आंदोलनासाठी परवानगी मागितलीये. एव्हंढच नव्हे तर आंदोलनाच्या परवानगीसाठी CJPनं दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय.
तर दुसरीकडे, सरकारनं दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानाची अधिकृत आंदोलन स्थळाची मान्यता रद्द केलीये. त्यामुळे सीजेपीच्या नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत आता आंदोलनांसाठी रामलीला मैदान, सीबीडी मैदान आणि बुराडी मैदान अशी 3 नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आलीयेत. मात्र जंतरमंतर मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. दिल्लीच्या सत्ताधीशांना हादरे देण्यात आतापर्यंत जंतर मंतरनं वेळोवेळी मोठी भूमिका बजावलीय़.
जंतरमंतरला ऐतिहासिक आंदोलनाचा इतिहास
1994 ते 2000
स्वतंत्र उत्तराखंड राज्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सलग 6 वर्ष संघर्ष
2011
अण्णा हजारेंचे जनलोकपाल आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलन
2012
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षा आणि कायद्यात बदलासाठी जंतरमंतरवर आंदोलन
2015
वन रँक वन पेन्शन अंतर्गत समान पेन्शनच्या मागणीसाठी निवृत्त लष्करी जवानांचं धरणं आंदोलन
2021
केंद्राच्या 3 कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, जंतरमंतरवरील आंदोलनानंतर सरकारची माघार
2026
नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात CJPच्या नेतृत्वात जेनझींचं आंदोलन, अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
जंतर मंतर मैदानाचा आंदोलन स्थळाचा दर्जा काढल्यामुळे अभिजीत दिपकेंनी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्लाबोल केलाय.
खरंतर, 1990 च्या दशकानंतर जंतरमंतर हे देशातील सर्वात मोठं आंदोलनाचं मैदान म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संसदेपासून जवळ असल्यानं देशभरातील आंदोलक आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या मैदानावर एकत्र येत असतात. पुढे दिल्लीतील याच मैदानावरून देशात परिवर्तन झालेलं अख्ख्या जगानं पाहिलंय. म्हणूनच की काय आता CJPच्या जंतरमंतरवरील आंदोलनाचा सरकारनं धसका घेतल्याची चर्चा रंगलीये. त्यामुळे CJP ज्ञानेश कुूमारांच्या राजीनाम्यासह जंतरमंतरचाही आंदोलनस्थळ म्हणून दर्जा कायम ठेवण्यासाठी संघर्ष करणार का? याचीही उत्सुकता वाढलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.