Assembly Election: मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण; PDP ने जाहीर केली उमेदवारांची यादी

Jammu-Kashmir Election : पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. विशेष या विधानसभेच्या रिंगणात मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी देखील उतरणार आहे.
Assembly Election: मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण; PDP ने जाहीर केली उमेदवारांची यादी
Jammu-Kashmir Assembly Election Iltija Mufti
Published On

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलीय. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आघाडीवर असून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. विशेष म्हणजे या विधानसभेत त्यांच्या मुलीली देखील उमेदवारी देण्यात आलीय. इल्तिजा मुफ्ती असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. इल्तिजाची ही पहिलीच निवडणूक आहे. इल्तिजाला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून उमेदवारी देण्यात आलीय.

मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवत आहेत. मेहबुबा यांनी यंदाची निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. आता त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. इल्तिजा मुफ्ती यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्या बऱ्याच काळापासून पक्षप्रमुखांच्या मीडिया सल्लागार म्हणून काम करताहेत.

हे आहेत आठ उमेदवार

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पीडीपी तयारीला लागली असून त्यांनी सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केलेत. त्यांनी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पीडीपीचे सरचिटणीस गुलाम नबी लोन हंजुरा यांनी ही यादी जाहीर केलीय.

अनंतनाग पूर्व - अब्दुल रहमान वीरी

देवसर - सरताज अहमद मदनी

अनंतनाग - डॉ.मेहबूब बेग

चरार-ए-शरीफ - नबी लोन हंजुरा

बिजबेहरा - इल्तिजा मुफ्ती

वाची - जी.मोहिउद्दीन वाणी

पुलवामा - वाहीद-उर-रहमान पारा

त्राल - रफिक अहमद नाईक

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती ३७ वर्षाच्या असून त्या या निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि युनायटेड किंगडमच्या वारविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलंय. कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होतं. तेव्हा इल्तिजा यांना मीडिया सल्लागार म्हणून नेमण्यात आलं होतं

Assembly Election: मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण; PDP ने जाहीर केली उमेदवारांची यादी
J&K Reorganisation Bill 2023: काश्मिरी पंडितांना मिळणार आरक्षण? संसदेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक सादर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com